अहिल्यानगर
पवित्र मारियाचा नम्रता व आदर्श गुण घ्यावा- महागुरुस्वामी डाबरे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मतमाउली यात्रा शुभारंभ झाल्यावर दररोज दहा दिवस नोव्हेना होतो. तेंव्हा आज पहिल्या नोव्हेना प्रसंगी मिस्सा अर्पण करताना पुणे धर्मप्रांत महागुरुस्वामी थोमस डाबरे यांनी हरिगाव चर्चमध्ये देवदूताच्या संदेशाला प.मारीयेचा नम्र प्रतिसाद या विषयावर प्रतिपादन केले. पवित्र मारियामध्ये तिची अनेक प्रकारे नम्रता दिसून येते. तिच्या डोळ्यासमोर प्रभू येशूचे बलिदान पहावयास मिळाले, आदी महत्वपूर्ण विवेचन महागुरुस्वामी डाबरे यांनी केले.
दि १० सप्टेंबर यात्रापर्यंत दररोज सायंकाळी नोव्हेना होईल. दि ३ सप्टेंबर रोजी फा.अजय डीमोनटी नगर यांचे “तो जे सांगेल ते करा प्रेशितीय कार्याची प्रेरक शक्ती”या विषयावर प्रवचन दि ४ सप्टेंबर – बिशप औरंगाबाद अम्ब्रेज रिबेलो यांचे “पवित्र माळेच्या रहस्यातील प.मरीयेचे वैभवशाली दर्शन, दि ५ संजय पारखे: मानवाच्या तारणातील प. मरीयेचे मध्यस्थीचे महत्व”दि ६ फ्रान्सिस ओहोळ”सांत्वनकर्ती नित्य सहाय्यक माता मरिया”दि ७ डॉमनिक ब्राम्हणे”प. मरीयेचे पृथ्वीवरील प्रकटीकरणाव्दारे मिळालेला संदेश”दि ८ भाऊसाहेब संसारे पुणे “सिनड २०२२-२३ ख्रिस्त सभेच्या सहवासात प. मरीयेची सहभागीता”दि ९ बिशप मुंबई बार्थोल बरेटो प. मारीयेचे चर्चमधील स्थान”या विषयावर धर्मगुरूंची प्रवचने झाल्यावर मतमाउली यात्रा महोत्सव दिनी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे “पवित्र मारीयेच्या जन्माचा उद्देश, ध्येय”या विषयावर हजारो भाविकांसमोर मुख्य प्रवचन होणार आहे.
ज्या भाविकांना प.मिस्सा बलिदान अर्पण करायचे असतील, नवस पूर्ण करायचे असतील तसेच दान अर्पण करायचे असतील त्यांनी चर्च ऑफिसमध्ये संपर्क साधावा. आपल्या धर्मग्रामातील भाविकांना दिवसभर समर्पित होणाऱ्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होऊन रात्री चर्चच्या आवारात न थांबता घरी परत जाण्याचा सल्ला द्यावा. दि ११ व १२ रोजी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मग्रामस्थ व चर्च संलग्नित सर्व संघटना हरिगाव यांनी केले आहे.