अहिल्यानगर
पवित्र मरीयेचे स्थान आपल्या जीवनात असावे- फा. डीमोनटी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे ३ सप्टेंबर रोजी यात्रापूर्व तिसरा नोव्हेना संपन्न झाला. त्यावेळी अहमदनगर येथील धर्मगुरू अजय डिमोनटी यांनी “तो जे सांगेल ते करा प्रेशितीय कार्याची प्रेरक शक्ती”या विषयावर प्रवचन करताना त्यांनी सांगितले की, पवित्र मरीयेने प्रेशितीय कार्यासाठी पवित्र मरिया कशा प्रकारे प्रेरणा देते ते पाहू. पहा मी प्रभूची दासी आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे माझ्याठायी होवो हे शब्द पवित्र मरीयेने देवदूताला उद्देशून उच्चारलेले शब्द आहेत आणि इ.स. ४३१ मध्ये जी एका संध्याकाळी जी संध्याकाळी बिशपांची परिषद झाली.
परिषदेमध्ये पवित्र मरीयेविषयी चर्चा करण्यात आली की, पवित्र मरीयेला कोणत्या नावाने ओळखावे आणि त्यामुळे तेथे ग्रीक भाषेमध्ये त्यांच्या समोर चार प्रकारची नावे होती ती म्हणजे फोटोकोस, आन्थ्रफोटोकोस, क्रिस्तोकॉस, थियोटोकोस. त्यापैकी वाहक आणि त्यांना कळाले की, पावित मरिया जर प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देत असेल तर ती फक्त वाहक नाही तर ती माता आहे. या विषयावर चर्चा झाल्या पण तो विषय घेतला गेला नाही. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे “ मनुष्य व मनुष्याची माता”या विषयात सुद्धा दृढ सापडले नाही. तिसऱ्या विषयात ज्याच्यामध्ये ख्रिस्ताची माता म्हणून पवित्र मारियेला ओळखले जात होते. परंतु ती फक्त ख्रिस्ताची माता नसून एका मानवाची माता होती. त्यानंतर चौथा विषय हाताळला त्यावर शिक्कामोर्तब झाले. तो म्हणजे देवाची माता त्या दिवसापासून ख्रीस्तसभा पवित्र मरीयेला देवाची माता म्हणून ओळखतील, ती कशा प्रकारे एक प्रेशितीय प्रेरणा आपल्या प्रत्येकाला देते.
पवित्र मरीयेची भक्ती त्या काळांपासून त्या शतकापासून उदयास आली. पवित्र मारिया आपल्या जीवनामध्ये तिचे काय स्थान आहे हे आपल्याला आज पहायचे आहे. परमेश्वर जेंव्हा एका व्यक्तीला पाचारण करतो त्याला प्रेषित बनवतो त्याला पाच अवस्थेतून जावे लागते. ती म्हणजे ईश्वरी अनुभव… हा स्वत:साठी नसून तो दुसऱ्यासाठी असतो. दुसरी अवस्था म्हणजे मिशन कार्य… परमेश्वर त्या व्यक्तीला एक प्रकारचे मिशन देतो. तिसरी अवस्था आहे मनुष्य अपात्रता दाखवतो, मी त्यासाठी पात्र आहे का? व चौथी अवस्था आहे ती म्हणजे परमेश्वर त्या व्यक्तीला आश्वासन देतो की मी तुझ्याबरोबर आहे. पाचवी अवस्था आहे प्रभू येशू त्याला आश्वासनानंतर चिन्ह देत असतो. या सर्व गोष्टी पवित्र मारीयेच्या जीवनात घडलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपण खिस्ती या नात्याने जणतो आहोत, प्रेशीतीय कार्य आपल्याकडून घडायचे असेल तर या सर्व अवस्थेतून जातो का? म्हणून ज्या व्दारे आपण पवित्र मरीयेचे स्थान आपल्या जीवनात असावे ती ज्या प्रकारे प्रभू येशूची प्रेषित होती त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा प्रभू येशूचे प्रेषित बनायचे आहे.
आजच्या नोव्हेनात प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी होते. दि ४ सप्टे रोजी औरंगाबाद धर्मप्रांत महागुरु स्वामी अम्ब्रोज रिबेलो यांचे पवित्र माळेच्या रह्स्यातील प.मरीयेचे वैभवशाली दर्शन”या विषयावर प्रवचन होणार आहे.