कृषी
सौर उर्जा सिंचन प्रणाली या प्रशिक्षणासाठी शेतकर्यांसह प्राध्यापक, विद्यार्थी जबलपुरला रवाना
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बँक अर्थसहाय्यित हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत प्राध्यापक, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन प्रणाली या विषयावर दोन तुकड्यांचे तीन दिवसीय प्रषिक्षण कार्यक्रम जबलपूर- मध्यप्रदेश येथे बोरलॉग इनस्टिट्यूट ऑफ साउथ एशिया (बीसा) येथे नुकतेच संपन्न झाले. दिनांक 6-8 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसाच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी या संस्थेत 40 प्रशिक्षणाथींची तिसरी तुकडी रवाना झाली.
या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात बोरलॉग इनस्टिट्यूटचे प्रमुख पंकज सिंह व त्यांचे नवी दिल्ली येथिल सहकारी परेश शिरसाठ आणि क्षितिज पांडे हे प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु. डॉ. पी. जी. पाटील यांच्या सुचनेनुसार व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी जाणार्या तिसरी तुकडी / बॅचला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी चे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शरद गडाख म्हणाले की आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपुर्ण करायचा असेल तर सौर उर्जा, जैवइंधन या नैसर्गिक संसाधनाचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. प्राध्यापक, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ व शेतकर्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. या प्रसंगी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी या प्रशिक्षणानंतर आयोजित करण्यात येणार्या कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांनी या प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम यांनी केले. यावेळी कास्ट प्रकल्पाचे डॉ. सचिन सदाफळ आणि कर्मचारी उपस्थित होते. सदरील तुकडीचे नेतृत्व इंजि. महेश पाचरणे करत आहेत.