अहिल्यानगर
सोनगाव परिसरातील अनोळखी फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सोनगाव – गेल्या पंधरा दिवसांपासून सोनगाव पंचक्रोशीत तसेच आठवडे बाजारात अनेक अनोळखी परप्रांतीय फिरत असून त्यांच्या चौकशीसाठी उपसरपंच किरण पाटील अंत्रे व सोनगावचे ग्रामस्थांनी आज राहूरीचे पोलीस निरिक्षक प्रतापराव दराडे यांना निवेदन दिले.
सोनगावच्या सर्वधर्म समभाव मित्रमंडळाच्या आरती साठी श्री दराडे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने त्यांचा, पोलीस उपनिरीक्षक शिंदे त्याचबरोबर त्यांच्या सहकारी पोलीस मित्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले गेले की, सोनगाव सात्रळ धानोरे पंचक्रोशी ची बाजारपेठ मोठी असून बागायती भाग आहे. आज पर्यंत आमच्या परिसरात चोरी दरोडे असे प्रकार क्वचित घडलेले असतील. परंतु गेल्या 15 दिवसांपासून परिसरात अनोळखी व्यक्तीची ये जा वाढल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले आहे. आम्हाला माहिती मिळाली असता अशा संशयित लोकांना विचारपूस केली असता या लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. उद्या काही घटना घडू नये म्हणून काही उपाययोजना सह आम्हाला मार्गदर्शन करावे तसेच या लोकांची चौकशी करावी. संशयित लोक हे बांगलादेशी असल्याचे जाणवते. तरी आपण आपल्या स्थरावर चौकशी करावी व होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार राहुरी यांना पाठवण्यात आल्याची माहिती उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनोळखी फेरीवाले फिरताना दिसत आहेत. या फेरीवाल्यांकडे विचारपूस केल्यानंतर कुठलिही माहिती मिळत नसल्याने तालुक्यातील पोलिस प्रशासनाने अनोळखी फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रश्नांची वेळीच मांडणी केल्याने सोनगावच्या या युवकांचे कौतुक होत आहे.
यावेळी पोलीस पाटील संतोष पाटील अंत्रे, मंडळाचे मार्गदर्शक मोहम्मद तांबोळी, प्रकाश वालझडे, भगवान धनवट, शाम डहाळे, सीताराम धनवट, विठ्ठल धनवट, भिमराज शिंदे, सदस्य संदीप अनाप, विश्वनाथ कडनोर, एजाज तांबोळी, कैलास भोत, शकुर तांबोळी, जावेद तांबोळी, सूर्यभान पगारे, प्रवीण प्रधान, सुरेश भोत, अजित डहाळे, गणेश सोनवणे, सुयोग भोत, ज्ञानेश्वर बुराडे, बोकद सर, सत्तार तांबोळी, राजू वालझडे यांच्या सह ग्रामस्थ व मंडळाचे तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.