छत्रपती संभाजीनगर

वाहेगावजवळ जळालेल्या अवस्थेत आढळली बेवारस कार…

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील वाहेगांव शिवारातील कॅनल जवळ  कार जळालेल्या अवस्थेत आढळली. त्‍यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कार कोणाची व कोणी जाळली, याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील वाहेगांव शिवारातील कॅनलजवळ ( एम एच १४ ई एच ४३३२ ) हि कार जळालेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामुळे शेती वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्‍ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलीस पाटील आत्माराम नवले यांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहूल भदरगे, गणेश खंडागळे यांना दिली. यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत तपास करत असतांना सदरील वाहन नामदेव गावंडे (रा.मांगेगाव ता.गंगापूर) यांच्या मालकीची गाडी असल्याचे आढळून आले व सदरील वाहन मांगेगाव येथून रात्री चोरीस गेले व सकाळी वाहेगाव शिवारात जळीत अवस्थेत आढळले. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button