अहिल्यानगर

शुभवर्तमानाची व मानवी मुल्ये जीवनात जोपासावी-फा.भाऊसाहेब संसारे

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व आठवा नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व आठव्या नोव्हेनाचे पुष्प “सिनड १९२२-२३ ख्रिस्त सभेच्या सहवासात प.मरीयेची सह्भागीता या विषयावर प्रवचन करताना पेपल सेमिनरी रेक्टर पुणे फा.भाऊसाहेब संसारे यांनी प्रतिपादन केले की, पवित्र मरीयेचा सण [जन्मदिन] आज आपण साजरा करीत आहोत. आज तिचा जन्मोत्सव आहे व ख्रिस्तसभेसाठी हा खूप महत्वाचा सण आहे. कारण पवित्र मारीयेने प्रभू येशूच्या आपल्या पुत्राच्या तारण कार्यात सहभाग घेतला.व सर्व मानव जातीला तारण प्राप्त करून देण्यासाठी ती सक्रीय राहिली.
पवित्र मरीयेच्या जीवनाकडे पहिले तर विशेष करून आपल्याला असे दिसून येईल की या मातेने सर्व मानव जातीच्या विकासासाठी ख्रिस्तसभेची व शुभवर्तमानाची मुल्ये मानवी मुल्ये आत्मसात केली. मानवी मुल्ये व शुभवर्तमानाची मुल्ये आत्मसात करून आपल्या जीवनात अंगीकारिली व लोकांसाठी तिने सातत्याने जीवनात ती वापरली. आपली मनुष्य जात, आपण पापी आहोत आपण चुकतो कमी पडतो आणि अशा वेळेस ही प.मरिया आपल्याकडे धावून येते व धावून आल्यानंतर ती काय करते ती आपल्याला शुभवर्तमानाच्या मूल्याने ती आपला सांभाळ करते, आपल्याला उत्तेजन देते, प्रेरणा देते. कारण तिच्याकडे जे भाविक येतात ते अनेक समस्यांना घेऊन येतात व संकटाना सामोरे जातात आणि अशा वेळेस प.मारिया त्यांना धीर देते, आधार देते.
ज्या ज्या कुटुंबामध्ये थोडीसी काम्जोर्ता आलेली आहे किंवा एकमेकांचे पटत नसेल अशा वेळेस प.मरिया त्यांना प्रेमाने सांभाळते. दोन शब्द सांगते की बाबानो एकमेकाला दुखवू नका. शुभ वर्तमानाची आणि मानवी मुल्ये जोपासा की जेणेकरून तुमचे कुटुंब अबाधित राहील, तुमचे कुटुंब अबाधित असेल तर परिसर अबाधित असेल, तुमचा परिसर अबाधित असेल तर देश अबाधित असेल, म्हणून प.मरीयाने आपल्या जीवनामध्ये सातत्याने मानवाच्या हितासाठी, कल्याणासाठी ते मानवाच्या विकासासाठी तिने आपल्या जीवनामध्ये मानवी मुल्ये आत्मसात केली व त्या मानवी मुल्यांचा सराव केला. मग तिच्याकडे कोणताही भाराक्रांत असो त्रासलेला असो ग्रासलेला असो कुठलाही व्यक्ती तिच्याकडे आला तर तिने त्याला आपलेसे केले.
आपले प्रेम दिले जिव्हाळा दिला.आणि अशी ही पवित्र मरिया ख्रिस्तसभेमध्ये खूप सक्रीय आहे व सक्रीय असते आणि आज तिचा आपल्याला काय संदेश असेल की आपणही तिची लेकरे म्हणून आपणही सक्रीय व्हावे आपणही मानवी मुल्ये जीवनात आत्मसात करावी आपणही शुभवर्तमानाची मुल्ये आत्मसात करावी. आपल्याला समजते, वाचता येते, लिहिता येते, आपल्याला सर्व काही माहित आहे. ज्ञान आपण आवर्जून करू शकतो, त्यामुळे तिची आपल्याला कदाचित विनंती असेल की माझ्या लेकरानो मानवी मुल्ये जोपासा, कारण आज जर तुम्ही आणि मी मानवी मुल्ये जोपासली नाही तर उद्याच्या पिढीला मानवी मुल्ये व शुभवर्तमानाची मुल्ये काय असेल ते समजणार नाही. गेल्या अनेक पिढ्यांनी ही मानवी मुल्ये न जोपासल्यामुळे आज जी काही संकटे आपल्यावर आहे. निसर्गाचा जो त्रास आपल्याला होत आहे. कोप आपल्यावर आहे त्याला एक कारण आहे. कारण आपण निसर्गाची काळजी घेतली नाही. शुभवर्तमानाची मुल्ये जोपासली नाहीत म्हणून आज पण त्रासाला, संकटाला सामोरे जात आहोत. म्हणून आपण सर्व प.मरीयेची लेकरे म्हणून मानवी मुल्ये व शुभवर्तमानाची मुल्ये काटेकोरपणे दैनंदिन जीवनात जोपासली पाहिजेत, पाळली पाहिजेत, जेणेकरून आपण माणुसकीच्या नात्याने सर्वांबरोबर आनंदाने गुण्यागोविंदाने राहू व नांदू.
आज प.मरीयेचा जन्मदिन असल्याने फा. भाऊसाहेब संसारे यांच्या हस्ते केक कापून ज्यांचा वाढदिवस पण आहे त्यांना त्यांनी भरविला. याप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डीस्ट्रीकट सुपिरिअर ज्यो गायकवाड, संजय पठारे, डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी आदी सहभागी होते. दि.९ सप्टेंबर रोजी मुंबई धर्मप्रांत बिशप बार्थोल बरेटो यांचे “प.मरीयेचे चर्चमधील स्थान या विषयावर प्रवचन होणार आहे. व मतमाउली यात्रा महोत्सव दि १० सप्टेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी आदींनी केले आहे.

Related Articles

Back to top button