अहिल्यानगर
पवित्र मातेप्रमाणे जीवन होण्यासाठी प्रयत्न व्हावे- महागुरुस्वामी; लाखो भाविकांच्या उपस्थितीत मतमाउली यात्रा संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव मतमाउली यात्रा ७४ वा महोत्सव संत तेरेजा प्रांगणात मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी व याजक नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी पवित्र मरीयेच्या जन्माचा उद्देश, ध्येय या विषयावर प्रवचन करताना सांगितले की, आज मतमाउलीचा ७४ वा जन्मोत्सव साजरा करीत आहोत. आपण काय होतो व आज काय आहे त्याचे चिंतन केले पाहिजे. मी या जगात जन्माला आलो त्यामध्ये परमेश्वराचा हेतू काय आहे. प्रत्येक जण जन्माला येतो. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे प.मारियेला निवडले आहे. त्या परिस्थितीमध्ये मी देवाला शोधतो, हा देव कोण आहे? मला त्याने मनुष्य म्हणून या जगात का पाठविले आहे, त्यामागे त्याचा हेतू काय आहे. आज पवित्र मरीयेचा जन्मदिवस साजरा करीत असताना तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण आपण चिंतन करीत आहोत. मरिया जेंव्हा आईच्या उदरात होती तेंव्हापासून निष्कलंक होती, पवित्र होती, निष्पाप होती. या मागे देवाचा हेतू हाच की ज्या मुलाला ज्या देवपुत्राला मी माझा जन्म देणार, त्या देवपुत्राला जन्म देणारी आई सुद्धा पवित्र असेल, हि परमेश्वराची योजना आहे व शाश्वत जीवनाप्रमाणे देवाला अशक्य असे काहीच नाही, सर्व शक्य आहे.
देव आपल्या जीवनात सतत आहे, कार्यशील आहे. मी परमेश्वरापासून विभक्त होऊ शकत नाही. मी परमेश्वरापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी मी जेथे उभा असतो. कारण परमेश्वराने मला निर्माण केले आहे. त्यावर देव प्रीती करतो, प्रेम करतो. त्या प्रेमामुळेच देवाने या मातेला निवडले. कारण तिच्या पाठीमागे देवपुत्र मनुष्यरूप धारण करून या जगात यावे व आमचे तारणकार्य करावे. कारण देवाच्या प्रतिमेप्रमाणे आहे. स्वार्थामुळे अथवा अन्य कारणामुळे मनुष्य देवापासून दूर गेला आहे. म्हणून त्याला नष्ट करणार तसे काही नाही, परमेश्वराने आपल्या देवपुत्राला पाठविले त्याने मरणाने मनुष्याला एक जीवन द्यावे हा मनुष्य पुन्हा देवाकडे जावो. आपण येथे आला आहात खूप आशा, आकांक्षा आहेत, विनंत्या आहेत. ती जरी मुर्तींमंत उभी असली परमेश्वराने ज्या कार्यासाठी पाठविले आहे, ते त्याचे कार्य मी पूर्ण करावे त्यासाठी क्षणोक्षणी माझ्या बरोबर असेल, प्रभू येशूच्या कार्यात सहकारिणी म्हणून ती सतत आपल्या पुत्राबरोबर आहे. ती आई प्रत्येक देशात दर्शन देत आहे. लूरडस म्हणा, फातिमा म्हणा, वेलंकिनी म्हणा, हरिगाव म्हणा, तेथे दर्शन देते.
वर्षात येथे जास्त लोक येत नाही पण या नोव्हेनाच्या वेळेस हजारो लोक येथे येतात. आपण सर्व दु:खी आहोत कष्टी आहोत त्यांना तसे ठेवावे असे नाही. परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे ती पवित्र आहे. ज्यावेळी आपण परमेश्वराजवळ असतो त्यावेळी शांती असते. देवापासून दूर जाणे म्हणजे अंधकारात जाणे, प्रभू येशू म्हणती सत्य मार्ग जीवन मीच आहे. तिचे एकच कार्य आहे तो ते काय सांगतो ऐकत रहा. प्रभू सांगतो मी ज्याप्रमाणे तुम्हावर प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ही आई आपल्या जीवनात चमत्कार घडवून आणणार आहे. हा देव खरा देव आहे. जिवंत देव आहे. आपल्यासारखाच असतो मला मदत करण्यासाठी तत्पर असतो. आज मातेकडे प्रार्थना करू या हे माते सुखी जीवन जगण्यासाठी आंधळा झालो आहे. विविध ठिकाणी आई मध्यस्थी करते ती सांगते “पाप करू नका,पापामुळे तुम्ही माझ्या पुत्राला दु;खी करता हे कार्य करण्यासाठी आपल्याला पवित्र असले पाहिजे, पवित्र शब्द पवित्र कृती ज्यामुळे दुसऱ्याला दु:ख होत आहे.
प्रभूचे वाचन काय आहे ते समजू शकली देवदुताशी बोलू शकली. ज्यावली कळले की ही देवाची इच्छा आहे. या मातेने परमेश्वराच्या इच्छेनुसार देवपुत्राला स्वीकारले. आपल्या तारणासाठी आज मातेचा जन्मदिवस खऱ्या मनाने स्वीकार असेल. आपला स्वार्थ आहे गर्व आहे पाप आहे ते त्याग केले जाईल. त्या मातेच्या चरणी जा ती माता स्वीकारणार आहे. आपण प्रार्थना करू या आपले जीवन तिच्याप्रमाणे पवित्र होण्यासाठी प्रयत्न करा. सर्वांसाठी प्रार्थना करतो आपले जीवन कष्टी आहे, विश्वास आहे. ह्या मातेच्या मध्यस्थीने मला शांती मिळणार, माझे रोग नाहीसे होणार, इ आशेने आलात ती माता तुम्हाला निराश करणार नाही. ती शांती देऊन जाणार आनंदाने जाणार, सुखी जीवन, ज्या जीवनात परमेश्वर आहे असे जीवन तुम्ही जगणार. आजच्या भव्य महोत्सवात प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक, रिचर्ड, सचिन, संजय पंडित, सायन शिणगारे, ज्यो गायकवाड आदी धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा महोत्सवासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार फा. सुरेश साठे यांनी मानले.