कृषी
कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कुक्कडवेढे येथील शेतकर्यांच्या बांधावर
राहुरी विद्यापीठ : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ विविध तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतावर भेटी देवून मार्गदर्शन करीत आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे व सर्व प्राध्यापक राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे या गावात माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत शेतकर्यांच्या शेतावर भेट दिली.
यावेळी शेतकर्यांच्या विविध समस्यांचे निराकरण किटकशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त चौधरी यांनी केले. कृषि विभागाच्या मंडळ कृषि अधिकारी श्रीमती विनया बनसोडे यांनी कृषि विभागाच्या योजनांसंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी विश्वनाथ पानसरे यांच्या सोयाबीन या पिकाच्या फुले संगम क्षेत्रास भेट देण्यात आली. याप्रसंगी कृषि वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सखेचंद अनारसे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रेरणा भोसले व उद्यानविद्या विभागाच्या प्रा. किर्ती भांगरे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विभागाचे पर्यवेक्षक आशुतोष ढुमणे, कृषि सहाय्यक पल्लवी ढोकचौळे, कुक्कडवेढे गावचे सरपंच दिपक मकासरे, उपसरपंच बाबासाहेब पानसरे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गटकळ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. अखिल भारतीस समन्वित, कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सिताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, पुणे येथील डॉ. प्रदिप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक नितीन घोडके व तालुका कृषि अधिकारी, पुरंदर यांनी काळेवाडी व दिवे या गावात भेट दिली.
यावेळी शास्त्रज्ञांनी या गावातील शेतकर्यांसोबत त्यांच्या पीक पध्दती, त्यांना येणार्या शेतीविषयक अडचणी या विषयी माहिती घेतली. याप्रसंगी शास्त्रज्ञांनी अंजीर पिकाली बहार नियोजन, सिताफळातील अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच रोग व्यवस्थापन या विषयी शेतकर्यांना प्रत्येक्ष बागेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सासवडचे कृषि पर्यवेक्षक गणेश जगताप यांनी शेतकर्यांना गांडूळ खत निर्मितीचे आवाहन करुन राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत गांडूळ खत शेडचा लाभ घेवून गांडूळ खताचा अंजीर बागेमध्ये वापर वाढविण्याबाबत आवाहन केले.
याचबरोबर कृषि संशोधन केंद्र, लोणावळा व तालुका कृषि अधिकारी, वडगांव मावळ यांच्या वतीने या उपक्रमांतर्गत कुरवंडे येथील शेतकर्यांसोबत उपस्थित राहुन त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्या शेतीविषयक अडचणींवर मार्गदर्शन केले. या परिसरात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. यावेळी भात रोग शास्त्रज्ञ डॉ. किरणसिंह रघुवंशी, कृषि सहाय्यक श्रीमती मनीषा दगडखैर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. वरील सर्व गावांमध्ये माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत झालेल्या या विविध ठिकाणी भेटीसंदर्भात संबंधीत शेतकर्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले.