अहिल्यानगर

सात्रळ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त

राहुरी | बाळकृष्ण भोसले – तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिपक नरहरी घोलप यांना वनस्पतीशास्त्र विषयातील “स्टडीज ऑफ सम फ्रेश वॉटर अलगी एज ए लिक्विड बायो फर्टीलायझर ऑन लिफी व्हेजिटेबल” या शोधविषयाच्या संशोधन कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. पदवी जाहीर करण्यात आलेली आहे.
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी हे त्यांचे संशोधन केंद्र होते. त्यांना राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. भाऊसाहेब औटी व विखे पाटील महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप हे सात्रळ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत. सात्रळ महाविद्यालयातील दोन एकर क्षेत्रामध्ये वनस्पती उद्यान साकारण्यामध्ये, महाविद्यालय परिसर सुशोभीकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. उद्यानात औषधी वनस्पतींची रोपवाटिका, नक्षत्र गार्डन, विद्यार्थी अध्ययनात लागणाऱ्या वनस्पतींची जोपासना केलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याअगोदर त्यांना चार आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये उत्कृष्ट पेपर सादर केल्याबद्दल बेस्ट रिसर्च पेपर अवार्ड प्राप्त झालेला आहे. तसेच यूजीसी, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हरियाणा येथील भगत फुलसिंग महिला विश्वविद्यालय यांनी घेतलेल्या शिक्षक उदबोधन वर्गामधील उत्कृष्ट सहभागाबद्दल बेस्ट स्टुडंट पारितोषिकही प्राप्त झाले आहे. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे डायरेक्टर एज्युकेशन तथा विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रदीप दिघे, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डाॅ. प्रभाकर डोंगरे, श्री शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. महेश खर्डे, राहाता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रामदास बोरसे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button