ठळक बातम्या
1365 दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणास इपीएस पेन्शन धारकांचा पाठिंबा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीचे श्रीगोंदा तालुका पदाधिकारी तसेच सदस्यांनी बुलढाणा उपोषण मंडपास भेट दिली. व 1365 दिवसांपासून सुरु असलेल्या साखळी उपोषण करीत असलेल्या पेंशनधारकांचे मनोबल वाढविले.
अहमदनगर जिल्हाध्यक्ष एस के समिंदर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके आप्पा यांचे नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील 44 पेंशन धारक सामील झाले होते. स्वतंत्र एस टी बस बुक करुन हे पेंशन धारक बुलढाणा येथे आले असता त्यांचे बुलडाणा टीम कडून स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचेसह वाळके आप्पा, समिंदर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीस उपस्थित राहिले.
यावेळी श्रम मंत्री सुरेंद्र यादव यांनी आश्वासन दिले की आपला इपीएस 95 पेन्शनधारकांचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल. कमांडर अशोकराव राऊत यांच्या प्रयत्नाने श्रम मंत्री यांनी बैठकीस अर्धा तास वेळ देऊन चर्चा केली. तसेच पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर व पुणे, इंदापूर व दौंड येथील पदाधिकारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीत दिलेल्या वेळेप्रमाणे या विषयावर चर्चा करणार आहेत व खा सुप्रिया सुळे यांचेशी सुद्धा त्यांचे या भागाचे दौऱ्याच्या वेळी भेट घेणार आहेत, अशी माहिती नगर जिल्हा संघटक संपत समिंदर व भगवंत वाळके यांनी दिली.