अहिल्यानगर
देवळाली प्रवरा येथे समान संधी केंद्र कार्यशाळा संपन्न
राहुरी : समाज कल्याण कार्यालय, अहमदनगर व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहु महाविद्यालय, देवळाली प्रवरा येथे एकदिवसीय समान संधी केंद्र कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रा. सौ.स्वाती हापसे हे होते. या कार्यक्रमासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे अहमदनगर समतादूत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज, जेटीएस महाविद्यालय बेलापुर चे प्रा. डाॅ. कोकाटे मॅडम, अशोकनगर महाविद्यालयाच्या प्रा. गायकवाड मॅडम व सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, समान संधी केंद्र समन्वयक अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यातील सर्व महाविद्यालयात मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनीना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, रोजगार, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार राहुरी व श्रीरामपुर तालुक्यातील सर्व महाविद्यालयात स्थापित समान संधी केंद्राचे प्राचार्य, समान संधी केंद्र समन्वयक अधिकारी यांना समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी समान संधी केंद्राचे स्थापन करण्याचे ध्येय, उद्देश, समाज कल्याण कार्यालयाच्या विविध योजना, प्रकल्प विषयी विस्तृत माहिती देऊन प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासप्रवर्ग, महिला, लहान मुले, अपंग यांच्यासाठी असणारे योजनांची माहिती खेड्या पाड्यातील सर्वांना मिळवुन देण्यासाठी सर्व विद्यार्थी, समन्वयक यांनी प्रयत्न करण्यासाठी व लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी या समान संधी केंद्राच्या माध्यमातून काम करण्याचे आव्हान यावेळी केले. बार्टीचे राहुरी तालुका समतादूत पिरजादे एजाज यांनी बार्टी तर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम व प्रकल्प विषयी उपस्थितींना माहिती दिली.
राजर्षी शाहु महाविद्यालय देवळाली प्रवराचे प्रा. सौ. स्वाती हापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व महाविद्यालयात समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थीने विविध उपक्रम राबवुन समाज हितासाठी तन मन धनाने सहभागी होऊन काम करण्याचा मोलाचा सल्ला यावेळी दिला. राहुरी व श्रीरामपुर तालुक्यातील सर्व महाविद्यालयांनी या कार्यशाळेसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचेेेे प्रश्न सोडविण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक महाविद्यालयात घेण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे समाजकल्याण समन्वयक रियाज शेख यांनी केले.