कृषी

जाणून घेऊयात कोण आहेत ऑक्टोबर महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : ऑक्टोबर महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन नरेंद्र पाटील व कृषि उद्योजक म्हणुन अभिजीत पाटील यांची निवड झालेली आहे. नरेंद्र पाटील हे मु. लोणी पो. खर्डी, ता. चोपडा, जि. जळगांव येथील शेतकरी असून कृषि पदवीधर अभिजीत पाटील हे मु.पो. नांदरखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील कृषि उद्योजक आहे.
शेतकरी आयडॉल नरेंद्र पाटील यांनी विविध फळे व भाजीपाला पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले असून विद्यापीठाच्या भुईमुग या पिकाची फुले भारती, हरभर्याची फुले विक्रम व तुरीची फुले राजेश्वरी या वाणांचे परिसरातील शेतकर्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन घेतलेले आहे. त्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच सेंद्रिय शेतीसाठी विविध निविष्ठांचा वापर आपल्या शेतात केलेला आहे. पॉली मल्चींग, नॉन ओवन फॅब्रीक क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच सिंचनासाठी शेततळ्याचा वापर करीत आहेत. नरेंद्र पाटील यांनी चक्राकार पीक पध्दत विकसीत केली असून त्यांनी सुरु केलेल्या शेती अवजारे भाड्याने देणे या व्यवसायामुळे परिसरातील शेतकर्यांचा फायदा झालेला आहे.
कृषि उद्योजक अभिजीत पाटील यांनी पुणे कृषि महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषि) चे तसेच अमेरीकेतील आयओवा स्टेट युनिव्हरर्सिटीतून उद्यानविद्या विषयात एम.एस.चे शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पिके व फळांची लागवड केलेली आहे. त्यांनी सन 2016 साली सुरु केलेल्या वनश्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून वनश्री शेतीसेवा व सल्ला केंद्र, वनश्री माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा, गोदाम निर्मिती, वनश्री हायटेक नर्सरी, शेतकरी सहाय्यता केंद्र तसेच कापूस जिनींग, प्रेसिंग व ऑईलमिलची स्थापना केली आहे. कृषि पर्यटन केंद्र, मत्स्यशेती, बांबु रोपवाटीका, सेंद्रिय उत्पादन प्रकल्प व औषधी वनस्पती लागवड या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी स्वतः चा तसेच परिसरातील शेतकर्यांच्या विकासात भर घातली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button