अहिल्यानगर

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग भगिनीस हातगाडी भेट

राहुरी | बाळकृष्ण भोसले –  राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने “चला व्यवसायिक बनवूया दिव्यांगाला” या उपक्रमांतर्गत राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग भगिनी कविता सूर्यवंशी यांना भाजीपाला व्यवसाया  साठी हातगाडी स्टॉल देण्यात आला. त्याचे उद्घाटन ह.भ.प. जालिंदर साळुंके महाराज व बंडूदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युगंधरा ग्रुपच्या अध्यक्षा विद्याताई करपे या होत्या. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. कविता सुर्यवंशी या बेरोजगार होत्या. त्यांना भाजीपाला व्यवसाय करण्याची इच्छा होती. परंतु परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना हातगाडी घेणे शक्य नव्हतेे. प्रहार चे पदाधिकारी मधुकर घाडगे, सलीमभाई शेख, विठ्ठल पांडे, नानासाहेब शिंदे महाराज, छायाताई हारदे,अप्पासाहेब ढोकणे, योगेश लबडे, बाबुराव शिंदे, भारत आढाव, विष्णु ठोसर, दत्तात्रय खेमनर, शिवाजी जाधव यांच्या सहकार्याने हातगाडी विकत घेऊन देण्यात आली.
ना मा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून त्यात चला घरी बांधु या दिव्यांगाचे या मध्ये संघटनेच्या वतीने तीन घरे बांधण्यात आली. चला चूल पेटवू या दिव्यांगाची या उपक्रमा अंतर्गत 250 दिव्यांगांना किराणा किट वाटप, आजारी दिव्यांगांसाठी दवाखान्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. नवीन दिव्यांग प्रमाणपञ मिळण्यासाठी शिबीर घेण्यात आले. युनिक आय डी कार्ड मिळण्यासाठी शिबीर घेण्यात आले.
आता राहुरी प्रहार संघटनेने नवीन उपक्रम हाती घेतला असून यात राहुरी तालुक्यातील दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करणार आहेत. यात समाजकल्याण मार्फत बीजभांडवल कर्ज, दिव्यांग वित्त महामंडळाचे कर्ज, राहुरी नगरपालिका स्वयंरोजगार कर्ज, विविध व्यवसाय उभे करून दिव्यांगांना स्वावलंबी बनवायचा राहुरी तालुका प्रहार चा मानस आहे. आपल्या भाषणातून विद्या ताई करपे यांनी सांगितले प्रहार दिव्यांग संघटने चे सामाजिक काम खूप छान आहे याचे अनुकरण इतरही संघटनेने घेणे गरजेचं आहे तसेच त्यांनी सांगितले युगंधरा ग्रुप च्या वतीने दिव्यांग विद्यार्थिनींना वाह्या वाटप करण्यात येणार आहे.
या वेळी प्रहारचे पदाधिकारी रवी भुजाडी, विठ्ठल पांडे, योगेश लबडे, नानासाहेब शिंदे, सुरेश दानवे, छायाताई हारदे, दत्तात्रय खेमनर, अनामिका हरेल, विष्णु ठोसर उपस्थित होते. सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले उपस्थितांचेआभार रवींद्र भुजाडी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button