शिक्षणवारी ज्ञान पंढरी
ॠतुजा रांका हिचे फिजियोथेरपीत घवघवीत यश, चिंचोलीकरांकडून कौतुकाचा वर्षाव
बाळकृष्ण भोसले | राहुरी – तालुक्यातील चिंचोली येथील व्यावसायिक राजकुमार रसिकलाल रांका यांची कन्या ॠतुजा रांका हिने वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या अशा फिजियोथेरपी विषयात विशेष प्राविण्य मिळविले असून ग्रामीण भागातील चिंचोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
चिंचोलीतील रसिकलाल व प्रमिलाताई यांची नात व प्रसिद्ध व्यावसायिक राजकुमार रांका यांची कन्या ऋतुजा सुरुवातीपासूनच शिक्षणात तरबेज होती. इयत्ता १० वीत ९० टक्के तर १२ सायन्सला तब्बल ८२ टक्के गुण मिळवत तीने आगामी काळात विशेष क्षेत्र चमकविण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. लहानपणी आपल्या पायाला दुखापत झाल्याने तीला फिजियोथेरपीष्ट कडे वारंवार जावे लागले होते. त्यातील सेवाव्रती भाव पाहून या क्षेत्रात करियर करण्याचे मनातूनच ठरविले असल्याचे तीने सांगत घरातून आईचाही या क्षेत्राकडे जाण्याचा मनोदय होता तर वडिलांचा दंतक्षेञ निवडण्याकडे कल असल्याचे तिने सांगितले. कोणत्याही प्रकारचे खाजगी शिकवणी न लावता प्राध्यापकांनी दिलेले धडे मनापासून गिरविल्याचे तीने सांगितले. जिद्द नि आत्मविश्वास बाळगला तर यश हमखास मिळते यावर ती ठाम असल्याचे जाणवते.
रस्ता, शेती, वीज, झाडे अशा विविध प्रकारच्या कामात काम करत असल्याच्या कारणाने होणारे अपघात तसेच विविध शारिरीक व्याधींनी येणारे कृञीम अपंगत्व यावर पारंगत फिजियोथेरपीष्ट विविध अंगाने आपली सेवा देत रूग्णाला आपले अवयव पुनर्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावत असतो तीच खरी मानवसेवा असल्याचेही ती म्हणते. या क्षेत्रात आज फिजियोथेरपीष्टची कमतरता असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या क्षेञाकडे वळण्याची अपेक्षाही तीने व्यक्त केली आहे.
प्रवरा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून या विषयात तीने विशेष प्राविण्य मिळविले असून चिंचोलीसारख्या ग्रामीण भागातील गावचे नांव उज्वल केले असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करून ऋतुजावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.