अहिल्यानगर
पेमगिरीत रंगला जागर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा
बाळासाहेब भोर | संगमनेर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली.
जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी हे विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून हातात तिरंगा घेऊन मोठ्या उत्साहात या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. तसेच हातात विविध घोषणांचे फलक घेऊन प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. ढोल ताशा व लेझीमच्या तालात सर्व विद्यार्थी रंगून गेले होते.
भारतभूमीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमला. हर घर तिरंगा, सामुदायिक राष्ट्रगान, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून व त्याबाबाद यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जवाहरलाल नेहरू विद्यालय व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व पेमगिरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.