अहमदनगर

गोटूंबे आखाडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वांतत्र्य दिन उत्साहात संपन्न

राहुरी : तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे भारतीय स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवी कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटूंबे आखाडा येथे साजरा करण्यात आला. 75 व्या स्वंतत्र दिनाचे ध्वजारोहण राहुरी खुर्द ग्रामपंचायतच्या सदस्य मीना मनोहर घोकसे यांच्या हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवानिमित्त भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षामधील उत्कृष्ट विद्यार्थांचा प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर साळवे हे होते.
या कार्यक्रमास उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य मनीषा शिवाजी शेंडे, मीना मनोहर घोकसे, आश्विनी कुमावत, शिवाजी पवार, उमेश बाचकर, प्रहार संघटनेचे दत्तात्रय खेमनर, आदिनाथ महाराज दवणे, भाजपा राहुरी खुर्द बूथ प्रमूख शिवाजी शेंडे, शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, शिक्षक तज्ञ जालिंदर शेडगे, अंकुश दवणे, पत्रकार रमेश खेमनर, दत्तू पुरी पत्रकार, किशोर पवार, सुरेंद्र राठोड, सुनिल शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका संजीवनी राऊत, सुनीता कल्हापुरे, छाया निमसे, वैशाली गायकवाड, अनिता मोरे, राणी साळवे, अमृता वनारसे या सर्व महीला शिक्षकांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी बहुमुल्य योगदान देऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. 
सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button