अहिल्यानगर

१७ ऑगस्टपासून शिरसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव विठ्ठल मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व साई सतचरित पारायण सोहळा दि. १७ ऑगस्ट पासून २४ ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

कथाव्यास ह.भ.प.बालयोगी ऋषिकेश महाराज ज्ञानाई शिक्षण संस्था गोंधवणी यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रम रोज पहाटे ४ वा. काकडां भजन, ७ वा. साईस्तवन मंजिरी, ८ वा. श्री साईचरित पारायण, दुपारी २ वा. भजन, साय.६ वा. हरिपाठ, रात्री ८ वा.भागवत कथा, दिनांक १७ ऑगस्ट-श्रीमद भागवत महात्म्य, गोकर्ण आख्यान दि १८ नारद चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव,दि १९ धृवचरित्र, नृसिंह अवतार, दि २०-वामन अवतार, रामचरित्र, दि २१ बाललीला वर्णन, दि २२-कृष्णविवाह वर्णन, रुख्मिणी स्वयंवर, दि २३-सुदाम चरित्र, ग्रंथ समाप्ती, सायंकाळी ५ वा. साईचरित ग्रंथ मिरवणूक, ७ वा दीपोत्सव, दि २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. ह.भ.प. ऋषिकेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक व सर्व मित्र मंडळे, भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर ट्रस्ट, शिरसगाव ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Back to top button