अहिल्यानगर
हरिगाव मतमाउली यात्रापूर्व आठवा नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे यात्रापूर्व आठव्या शनिवारी नोव्हेना भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी संगमनेर येथील संत मेरी चर्च येथील प्रमुख धर्मगुरू सायमन शिणगारे यांनी प्रतिपादन केले की पवित्र मरीयेचे जीवन हे आपल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी एक आदर्श आहे.
प.मारिया ही प्रभूची आई होणार हे यशया संदेष्ट्याने आपल्या ग्रंथामध्ये आगोदरच प्रकट केले होते. मरीयेला देवदूताचा संदेश यावर आपण मनन चिंतन करीत आहोत. पवित्र मारीयेचे पाचारण हे सर्व संदेष्ट्याच्या शिष्यांच्या पाचारणापेक्षा महान असे आहे. आज पवित्र मारिया आपल्याला दाखवून देते की देवाच्या हाकेला कसा प्रतिसाद द्यायचा. एक कुमारी स्त्री असताना त्यातल्या त्यात तिने कोणत्याही गोष्टीकॅहा विचार न करता मोठ्या धैर्याने परमेश्वराच्या तारण योजनेला होकार दिला. पुढे तिच्या जीवनात संकटे येतील अशी तिला कल्पना होती. लोक काय म्हणतील, धोंड्मार होऊ शकत होती, परंतु एका गोष्टीने पवित्र मारियेला या सर्व गोष्टीच्या पलीकडे बघायला प्रोत्साहित केले आणि ते म्हणजे परमेश्वरावरील तिचा विश्वास. परमेश्वराचा मारीयेवरील विश्वास हा आपल्याला पाहायला मिळतो. पवित्र मारिया आपल्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहे. आपण संपूर्ण आत्म समर्पण करायला पाहिजे. देवाच्या योजनेसाठी आपले जीवन समर्पित केले पाहिजे. आपण सर्वांनी कोणताही भेदभाव न करता एकमेकांना सहकार्य करून एकमेकावर प्रेम करण्याची गरज आहे. पवित्र मिस्सा संगमनेर येथील धर्मगुरू जेम्स थोरात यांनी अर्पण केला व पवित्र मारीयेचे ध्येय तुझ्याप्रमाणे होवो या विषयावर प्रवचन धर्मगुरू प्रशांत शहांराव यांनी केले. या नोव्हेनात लोयोला सदन प्रमुख धर्मगुरू डीस्क्रिकट सुपिरिअर ज्यो गायकवाड, नेल्सन परेरा, जॉन्सन क्षीरसागर, घुलेवाडी, डॉन बॉस्को चर्च धर्मगुरू तसेच हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी आदी धर्मगुरू सहभागी होते.
श्रीरामपूर येथून ७५ भाविक पदयात्रेने आले होते, कमालपूर, हरिगाव परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मतमाउली मूर्तीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी या सर्व धर्मगुरू यांनी पालखी हाती घेतली होती व भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. येत्या नवव्या शेवटच्या नोव्हेना प्रसंगी”पवित्र माळेचे रहस्य”या विषयावर दि २७ ओगस्ट रोजी होली फमिली चर्च कोपरगाव येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत. तरी या अध्यात्मिक कार्यक्रमात भाविकांनी श्बह्गी व्हावे असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी, ग्रामस्थ हरिगाव उन्दिरगाव यांनी केले आहे.