ठळक बातम्या
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोनगाव ग्रामपंचायतच्या २८ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
राहुरी : सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या २८ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष नामदेव अंत्रे होते.
यावेळी विखे पाटील कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडू पाटील, प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक सुभाष पाटील अंत्रे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, पाराजी धनवट, मच्छीद्र अंत्रे, सरपंच अनिल अनाप, उपसरपंच किरण अंत्रे मंचावर होते. 15 व्या वित्त आयोग आणि पंचायत समितीच्या वित्त आयोगाच्या निधीतून सोनगाव ग्रामपंचायतीस मंजूर झालेल्या सुमारे २८ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडला.
ग्रामपंचायतच्या निधीतून रस्ते कॉन्क्रीटीकरण, भूमिगत गटार स्वच्छता गृह, अंगणवाडी समोर व बाजारपेठेत प्लेव्हर ब्लॉक, पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लांट आदी कामांचा शुभारंभ पार पडला. सोनगाव ग्रामपंचायत सोनगाव सोसायटी व ग्रामस्थांच्या हस्ते नामदार विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नामदार विखे पाटील म्हणाले, ग्रामपंचायत सोनगाव च्या माध्यमातून सरपंच उपसरपंच व सर्वच सदस्य यांचे चांगले काम सुरु असून यापुढे हवी ती सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या वेळी विनोद अंत्रे, नारायण धनवट, मोहम्मद तांबोळी, दिलीप अंञे, संदीप अनाप, दत्तात्रय अंञे, प्रशांत अंञे, शरद अंञे, एजाज तांबोळी, चंद्रभान अनाप, सयाजी अनाप, बाळासाहेब अंत्रे, निलेश अंत्रे, न्हन्नुभाई पिंजारी, कैलास भोत, मथाजी अनाप, शकूर तांबोळी, सुभाष शिंदे, कैलास अनाप, भागुनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, संजय कानडे, भारत आनाप, सुभाष ब्राम्हणे आदींसह ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल, पोलीस पाटील संतोष अंञे, धोंडीराम वाकचौरे व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शामराव अंत्रे यांनी केले तर उपसरपंच किरण अंत्रे यांनी आभार मानले.