अहिल्यानगर
आकारपडीत जमीन वर्ग 2 पीक कर्ज बाबत शेतकरी संघटनेची ना. विखे यांच्या बरोबर चर्चा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्याच्या पूर्व भागातील अकारि पडित शेतकरी व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची त्यांच्या लोणी येथील कार्यालयात जाऊन भेट घेऊन यथोचित सत्कार करून अकारि पडित शेतजमीन, खंडकरी शेत जमीनीच्या वर्ग २ ला पिक कर्जाच्या संदर्भात मंत्री महोदयां सोबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी मंत्री महोदयांनी ॲड अजित काळे यांचे म्हणणे पुर्णपणे ऐकून घेतले व त्यानंतर स्वतः नऊ गावातील बाधित शेतकर्यांच्या साक्षीने असे आश्वासन दिले कि येत्या आठ दिवसात सदर प्रश्नी मंत्रालयात बैठक घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. सदर प्रश्नांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असून ॲड अजित काळे हे सदर प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतिने लक्षपूर्वक बघत आहेत. सदर प्रश्नी उच्च न्यालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होतेे. परंतु मध्यंतरी आघाडी सरकार कोसळल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे परत महसूल खाते आल्यामुळे बाधीत अकार पडित शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, ॲड सर्जेराव घोडे, शरद आसने, डॉ आदिक, डॉ नवले, दिलिप गलांडे, नाईक, बाळासाहेब आसने, रावसाहेब काळे, सुधीर आसने, शालनबाई झुरळे, संजय आसने, सुदाम आसने, सतिष आसने, दगडु पाटील आसने, लक्ष्मण आसने, लक्ष्मण चिडे, जालिंदर आबा आसने व इतर अकारि पडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.