अहिल्यानगर
पोलीस निरीक्षक गवळी यांचा शिरसगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : नुकतेच श्रीरामपूर येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचा शिरसगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुदगुले व सहकारी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे श्री साईबाबा मंदिर सुरक्षा पथकातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. ते मुळचे नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहेत. श्रीरामपूर शहर व परिसरासाठी तसेच शिरसगाव हे शहर हद्दीत येत असल्याने काहीही समस्या, तक्रारी असल्यास त्याची योग्य दखल घेतली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक गवळी यांनी यावेळी मुदगुले व सहकारी यांना दिले.