अहमदनगर
खोकर विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खोकर गावाचे उपसरपंच दिपक मोहन काळे यांनी खोकर विद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन सामाजिक बांधिलकी चा संदेश दिला. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेणं शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना वह्या रुपी मदत केली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि खारीचा वाटा म्हणून मदत केल्याचे समाधान मिळते. अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी मोहन काळे, कादरभाई शेख यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी खाजेकर, सुभाष काळे, किशोर कवडे, संगीता राऊत, संगीता फासाटे, संजय साळवे, संतोष कवडे, प्रियंका खराडे, अश्विनी यादव, हेमलता बोरुडे, दिपक आदिक, सुनील पानसरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर आभार किशोर कवडे यांनी मानले.