अहिल्यानगर
लोणी खुर्द गावात अखंड सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताह साजरा; काल्याच्या किर्तनात महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांकडुन जुन्या आठवणींना उजाळा
लोणी : सालाबाद प्रमाणे लोणी खुर्द गावात योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव यावर्षी साजरा करण्यात आला सन १९७२ ला दुष्काळ होता अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता त्यावेळी गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांनी सरला बेटाचे विश्वस्त मा आमदार चंद्रभान दादा घोगरे यांना बेटाचा योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह दिला व त्यांनी ही गावातील ग्रामस्थांच्या सहभागातुन ती जबाबदारी अत्यंत चोख पार पाडली. तेव्हापासून सन १९७२ पासून गुरुवर्य महंत नारायणगिरी महाराज यांनी हा सप्ताह लोणी खुर्द गावात सुरु केला व तेव्हापासून ते आजपर्यंत ही हरिनाम सप्ताह ची अव्याहत पणे अखंड सुरु असुन त्यास आज पन्नास वर्ष पुर्ण झाल्याने हा सप्ताह सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा केला.
या सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात बोलताना सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी म्हणाले आम्ही बेटावर येण्याच्या अगोदर लोणी खुर्द गावात या सप्ताहात बेटाचे शिवगिरी महाराज तथा नारायण तात्या यांच्यासोबत आठ दिवस सप्ताह करिता मुक्कामी असायचो याच सप्ताह बर्याच वेळा कृष्णजन्म निमित्त आम्ही कार्यक्रम केलेले असुन त्या कार्यक्रमास मा आमदार चंद्रभानदादा घोगरे आवर्जून उपस्थित असायचे लोणी खुर्द गाव हे निष्ठावंत असुन सरला बेटाशी जोडलेलं आहे. सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराज आणि मा आमदार चंद्रभान दादा घोगरे या दोघांचे एकमेकांवर खुप अंतकर्णत्मक प्रेम होते.
सदगुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी सन १९७२ पासुन सुरु केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता पन्नास वर्ष झाले आजही हे कार्य अखंडपणे सुरु आहे हा लोणी खुर्द गावाचा मोठा अभिमान असुन पुढे हेच कार्य गावाचे सरपंच जनार्दन घोगरे हे ग्रामस्थांच्या सहभागातुन करत असल्याची भावना काल्याच्या किर्तनात महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांनी व्यक्त केली.
या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन तसेज काकडा, हरिपाठ व अखंड हरिनाम करण्यात आले तसेज दररोज सायं ७.०० ते ९.०० वाजेदरम्यान हरि किर्तनाचा कार्यक्रम जवळपास दोन हजार भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला व सात दिवस किर्तनानंतर दोन हजार भाविकांना दररोज बाळासाहेब मच्छिंद्र आहेर, कै बाबासाहेब माधव आहेर यांच्या स्मरणार्थ इंजी अतुल आहेर, वैभव ज्ञानदेव घोगरे, कै पर्वत दादा डेंगळे यांच्या स्मरणार्थ प्रा किसन डेंगळे, मंगेश कारभारी घोगरे, कै नारायण तात्या घोगरे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय नारायण घोगरे, कै हिराबाई चंद्रभान घोगरे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय चंद्रभान घोगरे यांनी महाप्रसाद चे अन्नदान केले.
गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी सुरु केलेला व पुढे मा आ चंद्रभान दादा घोगरे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अखंडपणे सुरु ठेवला योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह लोणी खुर्द चा सुवर्ण महोत्सव लेने को हरिनाम, देणे को अन्नदान, तरने कों लिनता डुबनें को अभिमान या प्रमाणे सप्ताहाची सांगता झाली._ श्री जनार्दन घोगरे; सरपंच ग्रा.प लोणी खुर्द
सप्ताह सांगतेच्या दिवशी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ व योगिराज गंगागिरी महाराज व गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या प्रतिमेची सनई चौघड्याच्या तसेच टाळ मृदुंगाच्या नामघोषात मंगलमय वातावरण महामिरवणुक करण्यात आली त्यानंतर महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनानंतर सरपंच जनार्दन घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोकवर्गणी, शिदा दानाच्या माध्यमातून जवळपास चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहासाठी लोणी खुर्द ग्रा.प, लोणी सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व सदस्य व कर्मचारी तसेज गावातील सर्व भजनी मंडळ, भक्त मंडळ, ग्रामस्थ, भाविक, यांनी अनमोल योगदान दिले.