अहिल्यानगर
खुडसरगांव येथे स्वामी श्यामसुंदर महाराज यांना श्रद्धांजली
राहुरी : तालुक्यातील खुडसरगांव येथे युवक काँग्रेस व भजनी मंडळाच्या वतीने श्याम सुंदर महाराज पुरी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शामसुंदर महाराज पुरी सालेवडगांव यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक गावोगावी भक्तांशी थेट संपर्क होता.
गेली अनेक वर्षे त्यांनी अध्यात्माचा प्रचंड अभ्यास केला होता तसेच ते भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध होते. अनेक गावोगावी भक्तांना कथा कीर्तनातून ते मार्गदर्शन करत होते. विशेष म्हणजे तरुणांशी त्यांचा संपर्क जास्त होता. श्रद्धांजली साठी अनेक युवक, ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शरद निरंजन पवार, दीपक पवार, सोपान देठे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी प्रगतशील शेतकरी पोपटराव पवार, भाकचंद अण्णा देठे, रामभाऊ पवार, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब पवार, ज्ञानेश्वर पवार, जयदीप पवार, पांडुरंग पवार, सचिन पवार, शिवराज पवार, रामेश्वर पवार, निरंजन पवार, पुंजारी तारडे, पांडुरंग देठे, दुशांत पवार, यशपाल पवळे, विष्णू पवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक गावांमध्ये बैलपोळा साजरा केला नाही. असे साधू दुर्मिळ आहे स्वामींच्या जाण्याने प्रचंड दुःख होत असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.