अहिल्यानगर
तुळजापूरच्या मानाच्या पालखीच्या खिळे, पट्टी करण्याची आ. तनपुरेंच्या हस्ते विधिवत पुजा
राहुरी | बाळकृष्ण भोसले : तुळजापूर येथे मानाचे स्थान असलेल्या तुळजाभवानी मातेची पालखीची खिळे पट्टी करण्याची विधिवत पूजा आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे हस्ते आज सकाळी करण्यात आली. पालखी बनविण्याचा मान यावर्षी गोरख बबन रणसिंग ह्या घराचा असून प्राजक्त तनपुरे व गोरख रणसिंग ह्यांचे हस्ते पूजा करण्यात आली.
पोळ्याचे आधी दोन दिवस पालखीसाठी लागणारे सागवानी लाकूड बु-हाणनगर येथील भगत ह्यांनी आणून दिल्यानंतर दुसऱ्या दिवसा पासून कै. उमाकांत पवार ह्यांच्या घरातील अरुण पवार व सुनिल पवार ह्यांनी बनविली जाते. यावेळी तयार होत असलेल्या पालखीचे विधिवत पूजन करून खिळे, ठोकळे व कापूर आरती करून पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ, भागवत रणसिंग राजेंद्र रणसिंग, काशिनाथ रणसिंग, अमोल रणसिंग, अरुण पवार, सुनील पवार, साहिल रणसिंग नगरसेवक गजानन सातभाई, सूर्यकांत भुजाडी, शहाजी जाधव, राजेंद्र उदावंत, संदीप पानसंबळ, सुनील कोरडे, सुनील सुराणा, सोपान कातोरे, संजय ढोले, अनिल गुलदगड, सुनील कवडे आदि उपस्थित होते.