अहिल्यानगर
प्रा.डाॅ. महावीरसिंग चौहान व पापाभाई बिवाल ‘गुणवंत कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित
राहुरी |बाळकृष्ण भोसले – बहुजन रयत परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा गुणवंत कलारत्न पुरस्कार यंदा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा.डाॅ. महावीरसिंग चौहान व गोल्डन म्युझिकल नाईटचे समन्वयक पापाभाई बिवाल यांना सन्मानपुर्वक देण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
३० ऑगष्ट रोजी अहमदनगर येथील ओम गार्डन येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त झालेल्या शानदार समारंभात बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याच्या नगर शाखेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा विद्यार्थी कल्याण संचालक, गीतकार, कवी, संगीतकार, गायक तथा वादक असलेल्या प्रा. डाॅ. महावीरसिंग चौहान यांचा गुणवंत कलारत्न म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा सौ.कोमलताई साळुंके ढोबळे यांच्या हस्ते व नगर आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर राहुरी येथील दि गोल्डन म्युझीकल नाईटचे समन्वयक व ॲक्टोपॅड वादक कलावंत पापाभाई बिवाल यांनाही गुणवंत कलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रसंगी पुरस्काराची घोषणा राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री साठे सरांनी केली. प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान व पापाभाई बिवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.