महाराष्ट्र
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यामाने रिसीटीच्या वेस्ट इंटेलिजंट प्लॅटफॉर्मचे प्रात्यक्षिके
राहूरी विद्यापीठ प्रतिनिधी : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यामाने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ भारत सरकारच्या आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील अंजुमान हायस्कूल आणि गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे रिसीटीच्या वेस्ट इंटेलिजंट प्लॅटफॉर्मचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले.
हिलदारी अभियाना अंतर्गत महाबळेश्वर शहरातील प्रत्येक घर, दुकान, हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांना विशिष्ट QR code लावून डिजिटल सिस्टीम द्वारे जोडण्यात आले आहे. दररोज कचरा गोळा करतांना संबंधित भागधारकाच्या कचरा वर्गीकरणाची स्थिती तपासली जाते व त्यानंतर QR code स्कॅन करून त्याबाबतची नोंद उदा. कचरा वर्गीकृत केला आहे अथवा नाही, कचरा घंटागाडीत दिला अथवा नाही याची माहिती रिसीटी च्या एपद्वारे नोंदविण्यात येते.
या उपक्रमाची माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा व्हावी या हेतूने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने कचऱ्याच्या या संपूर्ण डिजिटल प्रवासाचे प्रात्यक्षिक हिलदारी टीम मार्फत अंजुमन हायस्कूल च्या एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनीना व गिरीस्थान प्रशालेच्या १६ शिक्षकांना दाखविण्यात आले. यात QR code स्कॅन केल्यापासून तर डॅशबोर्ड वर संपूर्ण शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणाची सद्यस्थिती, कचरा संकलनाची परिस्थिती, संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कचऱ्याच्या विल्हेवाटीपर्यत ची माहिती देण्यात आली.
सदर उपक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल भाई सुतार, सर्व सन्माननीय नगरसेवक, आबा ढोबळे, स्वच्छता निरीक्षक बबन जाधव, मनोज चव्हाण व सचिन दिक्षित, अंजुमन हायस्कूल च्या प्राचार्य शेख मॅडम व गिरीस्थान प्रशाळेचे प्राचार्य मुकंद माळी सर यांचे सहकार्य मिळाले.