शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयात ‘दि इम्पॅक्ट ऑफ स्पोर्टस न्युट्रीशन’ विषयावरील चर्चासत्र संपन्न

व्हिडिओसात्रळ महाविद्यालयात ‘दि इम्पॅक्ट ऑफ स्पोर्टस न्युट्रीशन’ विषयावरील चर्चासत्र संपन्न…


चिंचोली / बाळकृष्ण भोसले : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील  ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘दि इम्पॅक्ट ऑफ स्पोर्टस न्युट्रीशन’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा.डॉ. गंगाधर  वडीतके  हे कार्यक्रमाच्या अध्याक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. हरिदास हजारे  यांनी केले. सदरच्या प्रशिक्षणात योगा, प्राणायाम, ध्यान साधना, जिम, मैदानी सराव, मनोरंजनात्मक खेळ, स्पोर्टस  न्युट्रीशन, एरोबिक डॉन्स, गिर्यारोहण इत्यादीचा कृतींचा  समावेश करण्यात आला आहे. यामाध्यमातून कोरोनासारख्या महामारी विरूढ लढण्यासाठी विद्यर्थ्यांच्या तंदृस्तीमध्ये वाढ होवून त्यांची प्रतिकारशक्तीचा विकास झाल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने पोलीस व आर्मी यासाठी जी लेखी आणि प्रात्याक्षिक  परीक्षा घेतली जाते त्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या प्रात्याक्षिक परीक्षेचा  प्रशिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. महाविद्यालयात वरील प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण शा. शिक्षण क्रीडा संचालक प्रा. हरिदास हजारे व  प्रा.सुरेश अनाप हे दररोज विध्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने देत आहेत. या उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील युवा, युवती  व बेरोजगार तरुण घेत आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना शाश्वत शासकीय नोकरी करिता आशा पल्लवित झाल्या आहेत. हाच मूळ उद्देश ठेऊन संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष तथा आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नि:शुल्कपणे हा उपक्रम राबविण्यास प्रोत्साहान देले आहे.

या सेमिनारमध्ये डॉ.विद्या बडाख, प्रा. डॉ. बाबासाहेब सलालकर यांनी विद्यार्थ्यांना व सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. विद्या बडाख ह्या स्वतः डॉक्टर आणि आहारशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळामध्ये उत्कृष्ट कौशल्यासाठी कोणकोणते पोषक आहार घ्यावेत तसेच वेळेनुसार विविध प्रकारचा शारीरिक व्यायामासाठी  कोणते पोषणयुक्त आहार सेवन करावे व त्याच बरोबर पोषक आहारामध्ये कोणकोणत्या पोषक घटकांचा समावेश करण्यात यावा याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सामन्यत: मुलींमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे ऑनिमिकची स्थिती  जास्त प्रमाणात आढळून येते. यावर प्रभावी आहार कोणता घ्यावा याबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती स्पष्ट केली . पोषणयुक्त आहार न घेतल्यामुळे पाहिजे तसा प्रतिसाद खेळाडूकडून मिळत नाही. खेळाडूना दैनंदिन शारीरिक कसरतीसाठी आवश्यक असणारी उर्जा योग्य आहारातून मिळते. त्या उर्जेचे रुपांतर हे उत्कृष्ट खेळाडू निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. 

या सेमिनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. घोलप यांनी उपक्रम राबविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, प्रा. एस. एस. शेळके यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व आभार प्रा. सुरेश अनाप यांनी मानले. प्रसंगी बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते.

Related Articles

Back to top button