अहिल्यानगर
एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी गांगुर्डे तर ख्रिश्चन समाज अध्यक्षपदी लोखंडे
नगर : अहमदनगर येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची बैठक संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला.
या बैठकीत एस पी गांगुर्डे यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तर भाऊसाहेब लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य ख्रिश्चन समाज अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. बैठक राज्य सचिव संतोष निकम, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर शिंदे, सागर पवार, ज्ञानेश्वर राजपूत, सुनील ठाकरे, गोरक्ष धस, कान्दु सुखे आदींच्या उपस्थित पार पडली. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.