अहिल्यानगर

मृगजळाच्या मागे न पळता आई वडिलांचे कष्ट व संस्कार विसरू नका- पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे

स्वरूप सामाजिक फाऊंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांकडून आयोजक किरण पाटील अंत्रे यांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक

सोनगांव – राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे सालाबाद प्रमाणे स्वरूप सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने होणारा दहावी व बारावीच्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा सोनगाव येथील इंदूस्वरुप मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक सुभाष पाटील अंत्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे, उपनिरीक्षक खाडे, पोपाट पवार, विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष ना अंत्रे, मा संचालक पाराजी धनवट, मुळा प्रवराचे संचालक मच्छिंद्र अंत्रे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, शिक्षक बँकेचे मा चेअरमन साहेबराव अनाप, व्हा चेअरमन नारायण धनवट, पो कॉ जायभाय, लक्ष्मण अंत्रे आदी उपस्थित होते.
या गुणगौरव सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील ८५ विद्यार्थ्यांचा ट्रॉफी सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये एस.एस.सी, एच.एस. सी.परीक्षेत [ कला, विज्ञान, वाणिज्य ] परीक्षेत ७५ % पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच राज्यस्तरीय परीक्षेत, नवोदय, पी एच. डी मध्ये विशेष गुण संपादन केलेले विद्यार्थी यांचा ही समावेश असून गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे म्हणाले की, तुम्हाला गुणवंत विद्यार्थी बनवणाऱ्या आई वडिलांचे कष्ट व संस्कार विसरू नका. मृगजळाच्या मागे पळू नका. यापुढे तुमचे आयुष्य बदलेल पण भांबावून न जाता याच प्रमाणे गुणवत्ता टिकवून ठेवा. पोपट पवार यांनी ही करियर मार्गदर्शन करताना अगदी विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र अनाप, पाराजी धनवट,साहेबराव अनाप, संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील अंत्रे आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी सोसायटीचे संचालक शामराव अंत्रे, एकनाथ शिंदे, विनोद अंत्रे, अशोक अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य एजाज तांबोळी, कैलास भोत, संदीप अनाप, भारत आनाप, चंद्रकात अनाप, सयाजी अनाप, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष मोहंमद तांबोळी, ओबीसी युवा मोर्चाचे बिपिन ताठे, पोलीस पाटील संतोष अंत्रे, सर्जेराव अंत्रे, कृषिरत्न सुभाष शिंदे, सतिष म्हसे, वाल्मीक म्हसे, ज्ञानदेव अंत्रे, दिलीप अंत्रे, योगेश अंत्रे, विजय शिंदे, माथाजी अनाप, आण्णासाहेब ताजने, आबासाहेब अनाप, सचिन अंत्रे, पत्रकार अनिल वाकचौरे, भगवान लांडे, शकुर तांबोळी, ऋषाली हारदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी रमेश ताठे, शशिकांत अंत्रे, व्यंकटेश वाघमारे, किशोर जेजूरकर, प्रशांत अंत्रे, भानसहिवरे कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत अंत्रे यांनी केले, सूत्रसंचालन शामराव अंत्रे यांनी केले तर अमोल अंत्रे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button