अहमदनगर

आरोग्य दायिनी पवित्र मरीयेच्या मध्यस्थीने सर्व भाविकांसाठी विशेष प्रार्थना – फा.संपत भोसले

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व चौथा नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील हरिगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व चौथा शनिवार नोव्हेना भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी लोयोला सदन श्रीरामपूर प्रमुख धर्मगुरू ज्यो गायकवाड यांनी पवित्र मिस्सा अर्पण केला व आरोग्य दायिनी पवित्र मरिया”या विषयावर धर्मगुरू संपत भोसले यांनी प्रवचन केले.
याप्रसंगी हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, डिकन सुनील गायकवाड धर्मगुरू सहभागी होते. पवित्र मारियाबद्दल महिमा प्रतिपादन करताना फा. संपत भोसले यांनी सांगितले की, पवित्र मरिया ही आमची आई आहे आणि ती ख्रिस्ताने आम्हाला दिलेली आहे. ख्रिस्त क्रुसावर मरण पावला. त्या अगोदर क्रुसाच्या पायथ्याजवळ पवित्र मरिया व शिष्य योहान हे उभे होते व योहानाकडे पाहून म्हटले की ही तुझी आई व मारियेला म्हटले की हा तुझा पुत्र असून ती आपली आई आहे म्हणून त्याचा आदर केला पाहिजे.
आज तिच्या नोव्हेनासाठी आपण जमलो आहोत ते मातेचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. तिला विनंती करू या, हे माते आम्हाला दर्शन दे, तिच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यापूर्वी नोव्हेनाचे सण साजरे करतो, तिच्या विश्वासावर, तिच्या मार्गाने आपण चालत आहोत. ती सांगते की, प्रभू येशू सांगतो ते ऐका, आपल्या पुत्राच्या मध्यस्थीने जो चमत्कार झाला व सांगितले तो जे सांगेल ते ऐका, आपल्या प्रपंचात अनेक संकटे येतात. तिचा धावा केला की, आपल्यासाठी मध्यस्थी करेल व प्रभू आमच्यासाठी धावून येईल. आम्हाला संकटातून मुक्त करेल. म्हणून तिचा सन्मान करू या, व सर्व भाविकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आपण विशेष प्रार्थना करू या. आपल्या गावासाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी, भारतासाठी या मातेकडे विनंती करू या तिने आपल्या येशू ख्रिस्ताकडे याचना करावी आदी संदेश दिला. नोव्हेनासाठी श्रीरामपूर व परिसरातील भाविक पदयात्रेने येथे आले होते.
नोव्हेना झाल्यावर मेजर शफी शेख, प्रा.सुनील गाडेकर स्वराज अकॅडमी स्पोर्ट्स वतीने स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली. येत्या पाचव्या शनिवार दि ३० जुलै रोजी “देवाच्या योजनेतील पवित्र मरिया”या विषयावर डॉन बॉस्को चर्च सावेडी येथील धर्मगुरू यांचे प्रवचन व मिस्सा होणार असून त्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, व सर्व धर्मभगिनी, ग्रामस्थ यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button