अहिल्यानगर
दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना
अहमदनगर प्रतिनिधी : दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. श्री शिवाजीनगर या संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली. अहमदनगर येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय येथे जिल्हा उपनिबंधक दिग्विजयजी आहेर यांचे हस्ते दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र संस्थेचे चेअरमन प्रशांत काळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक बलभीम आप्पा शेळके, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात, कर्मवीर अकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू, मेजर पोपट ठोकळ, प्रवीण शेठ छाजेड, मुनीरभाई शेख, संस्थेचे संचालक दत्तात्रय दरंदले, मारुती मोरे, सुरेश कोकाटे, कृषी अधिकारी तान्हाजी शेळके साहेब, साई आदर्श चे संचालक चंद्रकांत कपाळे, जिल्हा सहकारी बँकेचे गोपीनाथ कोकाटे आदि मान्यवर उपस्थित होते.