अहिल्यानगर
१९ ऑगस्ट रोजी गणपती बनविणे कार्यशाळा
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर अंतर्गत मराठा प्रतिष्ठान महिला समिती यांच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ” शाडूची गणेश मूर्ती बनविणे”कार्यशाळेचे शिवबा हॉल थत्ते ग्राउंड, श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी प्रथम येणाऱ्या ३५ जणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे. पाण्याची बॉटल, बाउल, मूर्तीसाठी ताट किंवा पाट, न्यापकिन, पेपर इ. साहित्य घरून आणावे. वयोमर्यादा १० वर्षापुढील मुले, मुली व महिला यामध्ये सहभागी होऊ शकता, नाव नोंदणी सीमा जाधव मो.क्र ८८८८५५३१७६ व सौ ज्योती ठोकळ मो.क्र ९५११६३७७५८ येथे करण्यात येईल. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक आहे.