सामाजिक

स्वातंत्र्यदिनी बी आर चेडे यांना पत्रकारिता पुरस्कार

राहुरी प्रतिनिधी : स्वराज स्पोर्ट्स स्कूल व करिअर अकॅडमी हरिगाव यांच्या वतीने कोरोना महामारी काळात परिसरात वृत्त संकलनाचे सतत कार्य करीत असल्याबद्दल श्रीरामपूर येथील अखिल भारतीय क्रांतीसेना सदस्य व जेष्ठ पत्रकार बी आर चेडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्वातंत्र्यदिनी प्रमुख अतिथी दिलीप त्रिभुवन यांच्या हस्ते व सचिव प्रा.सुनील गाडेकर, सुनील शिणगारे आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
    या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भूमी फौंडेशनचे मार्गदर्शक प्राचार्य टी इ शेळके, संस्थापक प्रा.कैलास पवार, अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, अखिल भारतीय शिक्षक क्रांतीसेनेचे भागचंद औताडे, रंगनाथ माने, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, जगताप सर, भीमराज बागुल, भाऊराव माळी, डॉ शैलेंद्र भणगे, अशोक त्रिभुवन, गणेश मुद्गुले, संदीप त्र्यंबके, नवनाथ ढगे, सुभाष दरेकर, अक्षय मांडगे, बाळासाहेब भोर, शेखर पवार, सचिन गागरे, संदीप उंडे, अमित कोल्हे, संदीप डेबरे, अविनाश कुरूमकर, वैभव जाधव, साहेबराव जाधव, अजय जनवेजा, सलीम शेख, विठ्ठल शेजुळ, विकास म्हस्के, हर्षद धोंडे, गोकुळ नेटके, शब्बीर शेख, साजन शेख, दत्ता काकडे आदींनी चेडे काका यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button