अहिल्यानगर
कार्तिक धसाळ याची एन.डी.ए. साठी निवड
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगांव येथील कार्तिक बाळासाहेब धसाळ यांची एन.डी.ए. साठी निवड झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
आरडगांव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्तिक धसाळ याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. आत्मा मलिक कोपरगांव येथे एन.डी.ए. शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेथून परीक्षेची तयारी केली. बेंगलोर येथे उत्तीर्ण झाला. एन.डी.ए. म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. एन डी ए ची परीक्षा एका वर्षातून दोनदा होते.
डॉ सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख, माजी नगराध्यक्षा डॉ सौ.उषाताई तनपुरे, माजी उपसभापती रविंद्र आढाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे, सरपंच कर्णा जाधव, सुनील मोरे, बाळासाहेब म्हसे, कैलास झुगे, पोपट झुगे, बापुसाहेब धसाळ, विलास धसाळ, रमेश झुगे, बाबासाहेब जाधव, अनिल जाधव, अदिनाथ ढेरे, अशोक काळे, वेनुनाथ देशमुख, बापुसाहेब म्हसे, मनोहर म्हसे, आण्णासाहेब जाधव, शिवाजी झुगे, रविंद्र गायकवाड, पोलीस पाटील लक्ष्मण जाधव, ग्रामविकास अधिकारी किसन भिंगारदे व ग्रामस्थ उपस्थित होते.