अहिल्यानगर

स्वतःच्या स्वार्थासाठी द्वेष करून समाजात फुट पाडु नका : मा.आ. भाऊसाहेब कांबळे

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : माजी मंत्री बबनराव घोलप यांनी समाज हिताचे अनेक विधायक कामे करून अनेक योजना तळागाळातील समाज बांधवांपर्यंत पोचवल्या आहेत. संत रोहिदास महामंडळ वेगळे केले तसेच श्री संत रोहिदास जयंती शासकीय स्तरावर साजरी व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांच्या बद्दल द्वेष करून समाजात फूट पाडण्याचे काम कोणीही करू नये, असे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राहुरी तालुक्याची कार्यकारणी सोमवारी दुपारी हॉटेल भाग्यश्री येथे पार पडली. त्यात पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार भाऊसाहेब कांबळे (चर्मकार महासंघाचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष) होते. याप्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव दत्तात्रय गोतिसे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप कानडे, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, युवक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ दुशिंग, महिला उत्तर जिल्हाध्यक्षा श्रीमती मनिषाताई पोटे, अहमदनगर जिल्हा दक्षिण युवक कार्याध्यक्ष सुभाषराव भागवत, राहाता महिला तालुकाध्यक्षा प्रितीताई कानडे, राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांची प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई पोटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब कांबळे, संतोष तेलोरे, जिल्हा सल्लागार अण्णासाहेब देवरे, जिल्हा संघटक जिजाबा चिंधे, युवक जिल्हा उपाध्यक्ष कैलास चिंधे तसेच राहुरी तालुकाध्यक्ष राजाभाऊ कांबळे, तालुका उपाध्यक्ष कैलास ठोकळे, तालुका सचिव विजय तेलोरे, तालुका कार्याध्यक्ष जालिंदर देशमुख, तालुका सल्लागार विजय कांबळे, तालुका युवक अध्यक्ष सुनील देशमुख, युवक उपाध्यक्ष प्रसाद लोखंडे, तालुका सचिव प्रशांत कांबळे, तालुका सहसचिव लक्ष्मण तुपे, तालुका कार्याध्यक्ष अभिषेक साळवे, महिला पदाधिकारी राहुरी तालुकाध्यक्षा योगिताताई लक्ष्मण तुपे, उपाध्यक्षा शिलाताई जालिंदर देशमुख, राहुरी तालुका शिक्षक पदाधिकारी तालुकाध्यक्ष एकनाथ अर्जुन सोनवणे, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ देशमुख, तालुका सचिव आदिक सोनवणे, तालुका सहसचिव अमोल कदम, तालुका कार्याध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी राहुरी तालुक्यातील शेकडो चर्मकार समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मनिषाताई पोटे यांनी व सूत्रसंचालन सुभाषराव भागवत यांनी केले.

इतर समाजाच्या तुलनेत चर्मकार समाज अत्यल्प आहे. या परिस्थितीत दोन संघटना कार्यरत राहिल्या तर समाजात फूट पडेल. त्यामुळे केवळ समाजहितासाठी सामन्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत विजय कांबळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button