अहिल्यानगर
गणेशवाडी येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथील शाळेच्या आवारात ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थिनी कु. दहिफळे मेघा सुभाष हिने स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अंगणवाडीच्या आशा सेविका सरिता काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच कैलासराव दरंदले यांनी यावेळी करोना महामारीच्या वेळी गावकर्यांनी एकमेकाला केलेल्या सहकार्याबद्दल गावाचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच सौ हिराबाई आदिनाथ तांदळे, पोलीस पाटील संजय दहिफळे, विठ्ठल बडे, संदीप एकनाथ दरंदले, मिसाळ भाऊसाहेब, मुख्यध्यापिका मनीषा दरंदले, ग्रामसेवक भाऊसाहेब भिंगारदे व ग्रामस्थ उपस्थित होते.