अहिल्यानगर
सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. चोथानी यांना जलरंगातील साकारलेले व्यक्तिचित्र भेट
रवी भागवत ( चित्रकार ) : ज्यांच्या हाताला ‘God’s hand’ म्हणून संबोधले जाते असे श्रीरामपूरतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कुमार चोथानी यांचे साकारलेले जलरंगातील व्यक्तिचित्र त्यांनी हसतमुखाने स्वीकारले. श्रीरामपूरच नव्हे तर राज्य भरातून येणाऱ्या बाल रुग्णांसाठी ‘देव’ असलेले डॉ. चोथाणी इतक्या उंचीवर असताना देखील कुठलाही अभिनिवेश न बाळगता सर्वांशी अतिशय साधेपणाने वागतात, त्यांच्या देहबोलीतून झळकणारी नम्रता, माझ्यासारख्या साध्या कलाकाराप्रति त्यांनी दाखवलेली आत्मीयता पाहून त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला. आपले बालक सुखरूप बरे झाल्याने अनंदाश्रू तरळलेले सर्व पालक व तमाम श्रीरामपूरकरांच्यावतीने हे चित्र त्यांना भेट देताना मनस्वी आनंद वाटला.
यावेळी चोथानी सरांच्या सुविद्य पत्नी साधनाताई, कन्या प्राची, आमचे मित्र दै. पुण्यनगरी उत्तर अहमदनगर आवृत्ती प्रमुख विकास अंत्रे, दै. राष्ट्र सह्याद्रीचे ब्युरो चीफ प्रदीप आहेर, महाराष्ट्रभर नावाजलेले सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते हे उपस्थित होते. स्वतःचे व्यक्तिचित्र पाहिल्यानंतर डॉ.चोथाणी काही वेळ निःशब्द झाले. त्यांचे डोळे कमालीचे बोलके झाले. त्यांच्या या बोलक्या डोळ्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता माझ्यासाठी लाखमोलाची आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या एव्हरेस्टवीराकडून मिळालेली दाद आणि आशिर्वाद हे सर्व पुरस्कारापुढे फिके आहेत.