अहिल्यानगर
हरिगाव येथे स्वराज अकॅडमीचा स्वातंत्र्य दिन साजरा
श्रीरामपूर(बाबासाहेब चेडे) : हरिगाव येथे स्वराज स्पोर्ट्स स्कूल व करिअर अकॅडमीच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सरपंच दिलीप त्रिभुवन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी राज्यात, देशात नावलौकिक करावे, अशी अपेक्षा दिलीप त्रिभुवन यांनी केली. सूत्र संचालन प्रा सुनील गाडेकर यांनी केले. प्रारंभी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगणारी भाषणे केली. गीते गायली व देशभक्तीपर नृत्य, समूह गीताची मेजवानी दिली.
स्वातंत्र्यदिनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क्रीडा क्षेत्रात शिवम पटारे व अस्लम इनामदार याची महाराष्ट्र संघात निवडीबद्दल पुरस्कार, आदर्शवादी कुटुंब पुरस्कार- बाबासाहेब जाधव, रवींद्र शिंदे, विनोद कसबे, बाळासाहेब गडवे, सुनील शिणगारे, समीर आल्हाट, रामदास ताके, पत्रकार पुरस्कार-बी आर चेडे, फिलीप पंडित, शैक्षणिक पुरस्कार-प्रा.जयवंत परदेशी, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार-अंकिता गायकवाड, भाग्यश्री मोरे, शुभम गायके, भावना शेलार, गायत्री गहिरे, कोरोनायोद्धा पुरस्कार-डॉ कमलेश बोरा, डॉ विक्रांत खरात, डॉ संजय नवथर, डॉ लक्ष्मण मोहन, पो,हे.कॉ सुनील वाघचौरे, तसेच अधिपरिचारिका स्वाती लोखंडे, मनीषा हिवाळे, पंकज खरात, विद्या आल्हाट, माधुरी पाटोळे, मालती खरात, कोमल त्रिभुवन, तेजश्री सावंत, ज्योती जाधव, नंदिनी कळसाइत,त्याचप्रमाणे आर्मी जवान सुभाष जगताप सिलीगुडी यांना व सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना सन्मानित केले.
यावेळी प्रमुख अतिथी अध्यक्ष अविनाश काळे, सचिव प्रा सुनील गाडेकर, दिलीप त्रिभुवन, जिल्हा क्रीडा अधिकारी वीर, अतुल भालेराव, बी आर चेडे, फिलीप पंडित, भीमराज बागुल, सुनील शिणगारे, अमोलिक, पटारे, रमेश भालेराव, रामदास ताके आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिन सोहळा आयोजन स्वराज अकॅडमीचे प्रा.सुनील गाडेकर यांनी केले.