अहिल्यानगर
जिल्हा विभाजन ऐतिहासिक निर्णय व्हावा- राजेंद्र लांडगे
श्रीरामपुर / बाबासाहेब चेडे : नगर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास पन्नास लाख असुन भिन्न भौगोलिक परिस्थिती आहे. सर्वसामान्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा सहजतेने लाभ व्हावा आणि सर्वांगीण विकासास गती मिळावी या पार्श्वभूमीवर जिल्हा विभाजनचा युध्द पातळीवर ऐतिहासिक निर्णय व्हावा. तसेच पहिल्या टप्प्यात श्रीरामपुर जिल्हा करण्याची राज्याचे ज्येष्ठ महसुल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात सुवर्णसंधी असल्याचे श्रीरामपुर जिल्हा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी नुकतेच प्रतिपादन केले.
क्रांती दिनाचे औचित्य साधत विश्रामगृहावर क्रांतीसिंह नाना पाटील यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष इंजि. सुनील साठे यांची श्रीरामपुर लायन्स क्लबचे अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार प्रसंगी लांडगे बोलत होते. उपाध्यक्षपदी सचिन बडधे, लकी सेठी, सुनील साठे, कुणाल करंडेसह कार्याध्यक्षपदी सचिन पवार, नागेशभाई सावंत, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, डाॅ.महेश क्षिरसागर, तिलक डुंगरवाल, मधुकर म्हसे, चंद्रकांत परदेशी, सरचिटणीसपदी दादासाहेब झिंज, शैलेश कासार, भरत पवार, मनोज ओझा, सचिवपदी महेश कुलकर्णी, रुपेश हरकल, चरण त्रिभुवन, यासीन सय्यद यांचे नावांची औपचारीक घोषणा करणेत आली. प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले कि, प्रतिष्ठाणत॔र्गत जिल्हा विभाजन चळवळ अस्थिर वातावरणातही चालुच ठेवु. शिवाय श्रीरामपुरच्या सर्वांगीण विकासात्मकतेचा नारा पुढे जाण्याची गरज आहे, अशा अनेक कल्याणकारी विविध मुद्यांवर चर्चामध्ये सर्वानी सहभाग नोंदवला. श्रीरामपुरचे भवितव्याबद्दल योगदान देणारे आजीमाजी लोकप्रतिनिधींचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी स्थानीक लोकप्रतिनिधींची वेळोवेळी मदत घेण्यावरही ध्येयधोरणे निश्चित करण्यात आले. योगायोगाने जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडे महत्वाचे महसुल खाते आहे. ना. थोरातांकडुन जिल्हा विभाजनानंतर पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर कमी खर्च येणारा श्रीरामपुर जिल्हा घोषीत करतील अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे शिवसेना स्टाईलनेच श्रीरामपुर जिल्हा करुन ऐतिहासिक निर्णय घेण्यावर निश्चितच सकारात्मकता दाखवतील. शिवाय सर्वेसर्वा राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवारांनी श्रीरामपुर जिल्हा होण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुन वाच्छताही केली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांचा शब्द अंतीम करण्याची ना.बाळासाहेब थोरातांना सुवर्णसंधी आली आहे. या शिष्टाईत यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफसह जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, नगरविकास,उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, आ.लहु कानडे आणि नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना भेटून पुढाकार घेण्यावर साकडे घालणार आहेत. लवकरच ना.बाळासाहेब थोरातांसह राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्यावर यावेळी राजेंद्र लांडगे यांनी आखलेले रुपरेषेचे धोरण निश्चित करण्यात आले. मात्र या सामाजिक प्रश्नी साथ न मिळाल्यास वेळ प्रसंगी आक्रमक भुमिकाही घेऊ असेही आमचे प्रतिनिधीशी शेवटी बोलताना लांडगेनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कासार यांनी केले तर चरण त्रिभुवन यांनी आभार मानले.