अहिल्यानगर

मदत कि कर्तव्य…!

               बाळासाहेब भोर 

(युवक अध्यक्ष, अ. भा. क्रांतीसेना, संगमनेर)
नागरिकांवर कोणतंही संकट आलं तर सरकार असो, सामाजिक संस्था असो किंवा नागरिक असो सर्वप्रथम त्यांना अन्न, वस्र, निवारा व आर्थिक मदत दिली जाते.काही वेळेस सत्ताधारी व विरोधी पक्षातही आपण जनतेला किती मदत केली हे दाखविण्याची केविलवाणी स्पर्धा सुरु होते.मग वृत्तपत्र असेल सोशियल मिडिया असेल अशा माध्यमातून प्रत्येक जण आपापली बाजू खरी करण्याच्या प्रयत्नात असतो. असतो.थोडक्यात कोणत्याही आपत्तीत श्रेय्यवादाची लढाई नाही असं उदाहरण नाही. अतिवृष्टी, महापूर,चक्रीवादळ, भूकंप,दुष्काळ,कोरोना संकट असेल या सर्व संकटाशी सामना करण्यासाठी मदत, दिलासा या शब्दापेक्षा कर्तव्य या शब्दाला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे.दुर्दैवाने मदत,पॅकेज, दिलासा या सरकार असो वा नागरिक यांना त्यांच्या श्रेय्यवादामुळे आपल्या कर्तव्याचा विसर पडतो आहे असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे.कोणतंही काम आपण आपलं कर्तव्य म्हणून ज्या दिवशी करू त्या दिवशी कर्तव्य या शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं असतं त्या लोकप्रतिनिधींनी किमान त्या जनतेसाठी तरी श्रेय्यवादाची लढाई सोडून आपलं कर्तव्य म्हणून कोणताही दिखाऊपणा न करता आपण या सामाज्याचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्या नागरिकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.
         भारतीय राज्यघटनेने आपल्याला जसे मूलभूत हक्क,अधिकार प्रदान केलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत असताना कायदयाची चौकट ओलांडली जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. समाज्यामध्ये भरपूर लोक अशी आहेत कि ती आपल्याला संकटात मदत करतात पण त्याच रूपांतर कालांतराने उपकारात होतं त्यामुळे ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर त्याला उपकार या शब्दामुळे कर्तव्याचा विसर पडतो.त्यामुळे मदतीकडे आपण कर्तव्य म्हणून कधी बघणार?घसा कोरडा पडेपर्यंत आपण किती मदत केली ते सांगण्यापेक्षा ते आपलं कर्तव्यच आहे हे आपल्याला कधी कळनार? थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार असो वा संस्था,नेता असो वा नागरिक ज्यांच्याकडे मदत करण्याचे अधिकार असतील, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल,अशा लोकांनी त्याकडे कर्तव्य म्हणून बघितलं पाहिजे.

Related Articles

Back to top button