अहिल्यानगर
माजी मंत्री कर्डिलेंनी केली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची पाहणी
बाभुळगाव- खडकवाडी रस्ता कामाची पाहणी करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले समवेत मोरया ग्रुपचे अध्यक्ष गोरख अडसुरे आदी.
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील बाभुळगाव, खडकवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2019-20 अंतर्गत 2 कोटी 20 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम चालु आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केली. यावेळी मोरया ग्रुपचे अध्यक्ष गोरख अडसुरे, शरद ढगे, बाबासाहेब अडसुरे, साईनाथ कदम, संदिप बरे, संसारे साहेब, पांडुरंग काळे, दतु ढगे, बाभुळगावचे सरपंच गोरक्षनाथ गिर्हे, अशोक उंडे, गोरक्षनाथ तमनर, प्रशांत थोरात, निखिल जगताप, चंद्रभान आडसुरे, नंदु भालेराव, पोपट माने, नाथा माने, विलास माने, श्रावण कोळेकर, शिंदे वेळी, दत्तात्रय अडसुरे आदी उपस्थित होते.