साहित्य व संस्कृती
साहित्यिक योगदानाबद्दल कवयित्री सौ संगीता कटारे यांचा सन्मान
श्रीरामपुर /बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष कवियित्री सौ. संगीताताई अशोकराव कटारे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल टाकळीभान येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आमदार लहू कानडे, राष्ट्रसंत डॉ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी, डॉ. बाबुराव उपाध्ये, ह.भ.प.दत्तात्रय बहिरट, डॉ. सौ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. शिरीष लांडगे, प्रा. बाबासाहेब पवार, साईलता कृष्णा सामलेटी, कवी पोपटराव पटारे, ऋषिकेशदादासाहेब वाबळे, प्रा.कार्लस साठे,संयोजक अर्जुन राऊत, अक्षय कोकणे, ऋषिराज हापसे, संजय वाघमारे, रामेश्वर शिंदे, भैय्या पठाण, रामकिसन गायकवाड आदिंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
संगीता कटारे ह्या खोकर येथील गोरक्षनाथ विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. स्व. गोविंदराव आदिक यांच्या मातोश्री स्व. जानकीबाई आदिक यांच्यावर “मायजानकी “हा कवितासंग्रह लिहिला आहे. त्यांच्या वाचन संस्कृती चळवळीत मोठे योगदान असल्याबद्दल त्यांचा सन्मान केला असल्याचे संयोजक अर्जुन राऊत यांनी सांगितले.या सन्मानाबद्दल नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक,अविनाश आदिक,जयंत चौधरी, पत्रकार प्रकाश कुलथे, स्वामीराज कुलथे, डॉ. शिवाजी काळे आदी मान्यवरांनी संगीता कटारे, फासाटे यांचे अभिनंदन, कौतुक केले.