कृषी
प्रगतशील शेतकरी नवनाथ ढगे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : तालुक्यातील वरवंडी येथील युवा नेते प्रगतशील शेतकरी नवनाथ यादव ढगे यांना उत्कृष्ठ रिझलट मधुरम बाँस गोळी पेंड या खाद्याचा पुरस्कार मिळाला आहे.
नवनाथ ढगे यांनी गोळी पेंडचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने कंपनीने त्यांचा आदर्श शेतकरी पुरस्कार देवुन गौरव केला आहे. यावेळी त्यांचा फिल्ड मँनेजर महेश श्रीरसागर, भक्ती ट्रेडर्सचे मालक संदीप अडसुरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
ढगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, वरवंडी वि.वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे व त्यांना शुभेच्छा दिल्या.