अहिल्यानगर
एकलव्य आदिवासी बहूजन पार्टीचे अध्यक्ष जाधव यांचा कार्यकर्त्यांनी केला सत्कार
एकलव्य आदिवासी बहूजन पार्टीचे अध्यक्ष जाधव यांचा सत्कार पप्पू बनसोडे, दीपक सोळंकी, निकम सर, माजी नगरसेवक रवींद्र बर्डे आदी कार्यकर्ते.
राहाता प्रतिनिधी : तहसीलदार कार्यालयाकडुन जातीचे प्रमाणपत्र मिळुन देण्याचे आश्वासन राहाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय एकलव्य आदिवासी बहूजन पार्टीचे अध्यक्ष रेवन्ननाथ जाधव यांनी दिले आहे.
राहाता तालुक्यातील एकलव्य आदिवासी बहूजन पार्टीचे कार्यकर्ते पप्पू बनसोडे, दीपक सोळंकी, निकम सर, माजी नगरसेवक रवींद्र बर्डे, सुभाष शाख, संजय मोरे, सोमनाथ माळी, रोहित मोरे, नितीन पवार, राजू पवार, भास्कर पवार ,नारायण पवार, दौलत जाधव, कुंडलिक पवार, कैलास शाक यांनी एकलव्य आदिवासी बहूजन पार्टीचे अध्यक्ष रेवन्ननाथ जाधव यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. जाधव सत्काराला उत्तर देताना बोलत होते.