अहिल्यानगर

शिक्षक हा समाजाला प्रगतीच्या दिशेकडे नेणारा महत्वाचा घटक – नगराध्यक्षा अनुराधा आदिक


शिरसगाव प्रतिनिधी : शिक्षक हा समाजाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणारा महत्वाचा मार्गदर्शक घटक आहे.माझे वडील व तुम्ही सर्व शिक्षक माझे आदर्श आहात.ज्या समाजात शिक्षकाला महत्व दिले जाते तो समाज सतत पुढे जातो असे प्रतिपादन श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित अशोकनगर या पतसंस्थेच्या वतीने २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव व गुरुजन सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा मंगळवारी कोंग्रेस भवन श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी नगराध्यक्षा आदिक बोलत होत्या.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.व त्यांना स्व.खा.गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेचे मोठे घड्याळ भेट व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.संस्था सहसचिव विधिज्ञ जयंतराव चौधरी यांनी ज्या संस्थेचा एनपीए कमी असतो ती संस्था नेहमी प्रगतीपथावर जाते.आपल्या संस्थेचे काम एनपीए नसल्यामुळे अतिशय चांगले आहे.आपले नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस सरचिटणीस अविनाश आदिक व आम्ही सर्वजण मातृसंस्था म्हणून आपल्या शिक्षक, शिक्षकेतर बांधवांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ प्रा.बबनराव आदिक यांनी आर्थिक प्रश्नांची चर्चा करून अनुराधा आदिक यांना उज्वल भविष्य आहे. वडिलांप्रमाणे काम करण्याची धडाडी त्यांच्यामध्ये आहे असे प्रतिपादन केले.यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी भाऊसाहेब लवांडे, नितीन पवार, हंसराज आदिक, सुनील थोरात, पतसंस्था चेअरमन रवींद्र थोरात, व्हा.चेअरमन संगीता राउत, व्य.समिती सदस्य बबनराव लबडे,कैलास उंडे,रमेश वलटे, गोपीनाथ वमने,विजय गायकवाड,दत्ता आदिक,मनेजर संतोष दांडगे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापन समिती सदस्य शंकर शेलमकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन भास्करराव ताके यांनी केले.

Related Articles

Back to top button