अहिल्यानगर
राहुरीत कायदेविषयक शिबिर संपन्न
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुका विधिसेवा समिती व राहुरी तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कोर्टात कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती ए.एस.वाडकर या होत्या. लहान मुलांचे अधिकार, सक्तीचे शिक्षण व अधिकार ,बेटी बचाव बेटी पढाओ,बाल न्याय(मुलांची काळजी व सिक्युरिटी) अधिकार अधिनियम २०१५ पिडीतांसाठी नुकसानभरपाई आदी विषयी चर्चा झाली.
यावेळी सह.न्यायाधीश एम.पी.मथुरे, असोसिएशनचे अध्यक्ष ॲड डी.आर.तोडमल, ॲड. पी.एल.जामदार, ॲड.पल्लावी कांबळे, ॲड.आर.जी.मसमाडे, ॲड. हृषिकेश मोरे, ॲड.अनिल शिंपी, ॲड.आर.के.गागरे, उ-हे, ॲड.प्रकाश संसारे, ॲड. एन.जी. तनपुरे, ॲड. संदीप खपके, ॲड.स्वाती सांगळे, ॲड. अनिता तोडमल, ॲड. कल्याणी पागिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. एस. जी.लांबे यांनी केले तर आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. एम.बी.देशमुख यांनी मानले.