अहिल्यानगर

आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी श्रीरामपूर पोलिस करी जिवाचे रान; म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांचा सन्मान

आझाद फाऊंडेशनच्या वतीने हरेगांव फाटा पोलिस चौकीच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार 
अहमदनगर/ जावेद शेख : येथील हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी नाईक किरण पवार, राजेंद्र देसाई, गणेश गायकवाड आदी कर्तव्य तत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलिसांच्या उत्कृष्ट कामगीरीने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी २,३ अपहरण प्रकरण तसेच मोबाईल गहाळ प्रकरणी मोठी कसरत आणि मेहनत करत सदरील प्रकरणी गुन्ह्याचा २४ तासाच्या आत छडा लाऊन उत्कृष्ट कामगीरी बजावली असल्याबद्दल येथील आझाद फाऊंडेशनच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक संजय सानप आणि हरेगांव फाटा पोलिस चौकीच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप, पोउनि. समाधान सुरवाडे, गोपनीय शाखेचे पोकॉ.गुंजाळ, संतोष परदेशी, संतोष दरेकर, तुषार गायकवाड, महेश पवार, हरेगांव फाटा पोलिस चौकीचे पोलिस नाईक किरण पवार, राजेंद्र देसाई, गणेश गायकवाड समवेत आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष साजिद शेख, राज खान, फारुक शेख, परवेज शेख, असलम शेख, समता फाऊंडेशनचे ॲड. मोहसीन शेख, जिशान सय्यद, सचिन धनवटे, नजीम शेख, राहुल भोसले, मतीन शेख, नदीम सय्यद, तबरेज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button