अहिल्यानगर
राहुरीतील धानोरे येथे शिवसंपर्क अभियान
राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील धानोरे घाट येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती युवासेना तालुकाध्यक्ष गणेश खेवरे व तालुका उपप्रमुख कन्हैया दिघे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने तालुक्यात धानोरे घाट येथे शुक्रवार दि. ३० जुलै रोजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रमभैया राठोड व युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश कोतकर, शिवसेना तालुकाप्रमुख विजय ढोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या शिवसंपर्क अभियानास शिवसैनिक व युवासैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना तालुकाध्यक्ष गणेश खेवरे व तालुका उपप्रमुख कन्हैया दिघे यांनी केले आहे.
या शिवसंपर्क अभियानात रक्तदान शिबिर, सदस्य नोंदणी, शाखाप्रमुख नियुक्ती व जनतेशी संवाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.