कृषी
तांभेरे येथे कृषीदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मालेगाव येथील एच एच एस एस मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयातील कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी रोहन बाळासाहेब गागरे यांचे ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगीक कार्यानुभव २०२१-२०२२ च्या अभ्यास दौऱ्याचे नुकतेच तांभेरे (ता.राहुरी) येथे आगमन झाले. कृषीदूत रोहन बाळासाहेब गागरे यानी शेतकर्यांना शेतावर जाऊन बीजप्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चारा प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन,फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. कृषीदूताचे ग्रामस्थांनी, शेतकर्यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकर्यांनी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला.तसेच या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. ए. राऊत, उपप्राचार्य डॉ. पी. के. सुर्यवंशी, तसेच प्रा. जी. एस. बनसोडे, प्रा. एस. बागल, प्रा. एस. अहिरे, प्रा. एस के उदमले, प्रा. एस. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.